Tarun Bharat

कर्पेवाडी परिसरात हत्तीचा धुमाकूळ

Advertisements

प्रतिनिधी/आजरा

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागासह जेऊर, चितळे परीसरात वावर असलेल्या हत्तीने शुक्रवारी रात्री आजरा शहरानजीकच्या कर्पेवाडी खालसा परिसरातील शेतात धुमाकूळ घातला. येथील भिकाजी पाटील यांच्या शेतातील केळी, सुपारीची झाडे मोडून टाकली, शिवाय ऊस पिकाचेही नुकसान केले.

आठ दिवसांपूर्वी हत्ती चितळे-जेऊर परीसरात ठाण मांडून होता. आजरा-चंदगड रस्ता ओलांडून आजऱयाकडे येताना जेऊर येथील ग्रामस्थांना हत्तीचे दर्शन झाले होते. चार दिवसांपासून याच परिसरात हत्तीचा वावर सुरू होता. शुक्रवारी रात्री आजरा शहरालगत असलेल्या कर्पेवाडी खालसा परिसरात हत्ती दाखल झाल्याने शहरावासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पिकांचे सातत्याने नुकसान करीत असलेल्या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पाटील यांच्यासह या परीसरातील शेतकऱयांनी केली आहे.

Related Stories

कोल्हापूर : सबजेलमधील ३१ बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह; कारागृह प्रशासन हादरले, कारागृहातच उपचार सुरु

Archana Banage

खोची- दुधगाव बंधारा पाण्याखाली; वारणेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : संभापूर ग्रामस्थांच्या सहभागातुन प्राथमिक शाळेचे बदलले रुप

Archana Banage

मुंबई-बेळगाव विमान प्रवासाला तुर्तास ब्रेक

Archana Banage

राशिवडेत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

आता सण-उत्सवांवर ‘जीएसटी’चे सावट…

Kalyani Amanagi
error: Content is protected !!