Tarun Bharat

कर्मचारी कामावर हजर न राहिल्यास वेतन कपात करणार : मुख्यमंत्री

Advertisements

बेंगळूर : परिवहन कर्मचारी तात्काळ कामावर हजर न राहिल्यास त्यांचे वेतन कपात करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे. रायचूर जिल्हय़ातील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. संपाला संबंधित कोणालाही चर्चेसाठी आवाहन करणार नाही. तसेच याविषयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कर्मचाऱयांनी आदराने कामावर हजर रहावे. वाहतूक व्यवस्थेत झालेल्या समस्यांना परिवहन कर्मचारीच जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील पोटनिवडणुकीत जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असल्याने मतदारांनी भाजप विरोधात बोलणाऱया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमारांना योग्य धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.

Related Stories

सीटी स्कॅनची सुधारित किंमत २,५०० रुपये

Abhijeet Shinde

राज्यात 300 हून अधिक ब्लॅक फंगसचे रुग्ण

Amit Kulkarni

उपराष्ट्रपतींचे नागरिकांना ‘जंक फूड’ टाळण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

बेंगळुरात कोरोनाबाधितांची घरे सीलडाऊन

Amit Kulkarni

तपास पूर्ण होईपर्यंत माध्यमांना माहिती देऊ नये

Amit Kulkarni

२०२१ मध्ये कर्नाटक विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!