Tarun Bharat

कर्मचाऱ्यांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना पत्र, प्रत्येक विभागात जाऊन पाठिंबा आणि संपात सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी/कोल्हापूर

sकोल्हापूर जिह्यातील चार एसटी आगारांमधील 15 कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी प्रशासनाच्या या कारवाईचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान सर्व संपकरी कर्मचाऱयांनी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना आमच्यासोबत संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच निलंबनाची कारवाई करताना सर्वांवर करावी. जर निलंबित कर्मचाऱ्यांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, अशा आशयाचे पत्र कोल्हापूर आगारातील सर्व एसटी कर्मचाऱयांनी विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचारी एकजुटीने लढा देत आहेत. ठिय्या मांडून बसलेल्या कर्मचाऱयांनी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान कोल्हापूर विभागीय कार्यालयात धडक मारली. या कार्यालयातील असणाऱया सांख्यिकी, कामगार, लेखा, वाहतूक विभागातील सर्व अधिकारी वर्गाला ‘बघता काय संपात सामील व्हा’ अशा घोषणा देत संपात सहभागी होण्याचे तसेच पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी अधिकारी वर्गापुढे आपले म्हणणे मांडले.

दरम्यान, नांदेडचे विभागीय नियंत्रक माळी यांनी प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता स्वत:च्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती येथील संपकरी कर्मचाऱयांनी दिली.

कारवाईला घाबरत नाही…
चार आगारातील 15 जणांवर केलेल्या कारवाईचा सर्वांनी निषेध केला. ही कारवाई कोणत्याही कर्मचाऱ्याने स्वीकारलेली नाही. अशा प्रकारची कारवाई कोणा एकावर होऊ देणार नाही, असा ठाम निर्णय बोलून दाखवत कारवाई करायची असेल तर सर्वांवर करा. कारवाईला घाबरत नाही, असा निर्धारही त्यांनी केला.

Related Stories

जिल्हय़ात आजपर्यत ६५० जण कोरोनामुक्त

Archana Banage

चार महिने पगार नाही.. तरीही रूग्णसेवा

Archana Banage

मोफत धान्यांतील अनियमिततेतून वादाची ठिणगी; ग्राहकांतून तीव्र नाराजी

Abhijeet Khandekar

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

Archana Banage

मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल गुन्हेगार अटकेत

Archana Banage

कोरोना नियम तोडणाऱ्या 1961 जणांना दणका

Archana Banage