Tarun Bharat

कलंगुट येथे स्पेअर पार्टच्या दुकानाला आग

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय , आगीत सुमारे तीस लाखांचे नुकसान

म्हापसा / प्रतिनिधी

नाईकवाडा-कलंगुट येथे शेक हजर अली यांच्या दुचाकी स्पेअर पार्टसच्या दुकान व गॅरेजला आग लागली. या आगीत दुचाक्मया, स्पेअर पार्ट, ऑइल आणि टायर्स आदी सामान पूर्णपणे जळून खाक झाले. यात सुमारे तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज दुकानाचे मालक शेक हजर अली व पिअरना अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. लॉकडाऊन असल्याने हे दुकान बंद होते. गुरुवारी दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी या गॅरेजमधून धूर येत असल्याचे पाहिल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आतून आगीचे लोळ बाहेर येऊ लागल्याने या घटनेची माहिता पिअरना अग्निशामक दलास देण्यात आली. जवान लाडू सावंत व रामा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र दुकानाचे शेटर लॉक असल्याने जवानांना आत जाण्यास बराच त्रास झाला.

 गॅरेजचे शटर बंद असल्याने दलाच्या जवानांनी शटर तोडून आत प्रवेश केला. आगीचा भडका पाहून म्हापसा येथूनही एक बंब बोलविण्यात आला मात्र तोपर्यंत सर्व सामान जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाचे जवान लाडू सावंत व रामा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामसुंदर पाटील, रुदेश पांढरे, जितेंद्र बली, दत्तप्रसाद सिनारी, शाहीर च्यारी, धनंजय वस्त, नारायण चोडणकर, देवेंद्र नाईक, सनिल बाणावलीकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही आग विझवण्यासाठी तीन बंबचा वापर करण्यात आला.

 म्हापशातील बंब ब्रेकडाऊन झाल्याने गोंधळ

दरम्यान, म्हापशातील बंब घटनास्थळावरून येत असताना ब्रेकडाऊन झाल्याने एकच गोंधळ उडला. या स्थानकातील दुसऱया बंबामध्ये काही नादुरुस्ती झाल्याने तोही बंद पडला. अखेर उशिरा मेकॅनिकला बोलावून या बंबची दुरुस्ती करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार येथील एक बंब जुना असल्याने यात अनेकवेळा नादुरुस्ती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी याचवेळी शिरसई येते गवताच्या गंजीला आग लागल्याने पिअरना येथील बंब घटनास्थळी पाठविण्यात आले.

Related Stories

शंकर रामाणींवरील पुस्तकांचे उद्या पणजी येथे प्रकाशन

Amit Kulkarni

संघटितपणे कार्य केल्यास साखळी जिंकणे सोपे

Amit Kulkarni

लाखो लाडली लक्ष्मी ‘लाख’ रुपयांच्या प्रतीक्षेत! : आप

Omkar B

फोंडा तालुक्यातील 19 पंचायतीमधून 602 उमेदवार रिंगणात

Amit Kulkarni

आजच्या ‘इस्टर’वर कोरोना, लॉकडाऊनचे सावट

Patil_p

घरातील कचरा वर्गीकरणाविना सोपविल्यास 5 हजारांचा दंड

Amit Kulkarni