Tarun Bharat

कलखांब येथे लक्ष्मी मंदिरात चोरी

सोन्या-चांदीचे दागिने लांबविले

प्रतिनिधी/ बेळगाव

कलखांब (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली असून चोरटय़ांनी सुमारे 25 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

या संबंधी सुधीर रामा सुतूर यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर मंदिराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला आहे. देवीच्या अंगावरील चार ग्रॅमचे मंगळसुत्र, 3 ग्रॅमची कर्णफुले व 200 ग्रॅम चांदीचे दागिने चोरटय़ांनी पळविले आहेत.

दान पेटीतील 1500 रुपये रोख रक्कमही लांबविले आहेत. मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. चोरटय़ांनी तालुक्मयातील मंदिरांना आपले लक्ष्य बनविले असून गेल्या पंधरवडय़ात पाचहून अधिक मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. पोलीस यंत्रणा सुस्त झाली आहे.

Related Stories

आरपीडी कॉलेजमध्ये भगतसिंग जयंती साजरी

Amit Kulkarni

आरपीडी महाविद्यालय आवारात आढळला साप

Amit Kulkarni

नगराध्यक्ष जयवंत भाटले यांचा सत्कार

Patil_p

बोडकेनहट्टी येथील काळम्मादेवी मंदिरात चोरी

Amit Kulkarni

सुस्थितीतील रस्त्याचेच डांबरीकरण!

Amit Kulkarni

कर्नाटक : बेंगळूरनंतर दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

Archana Banage