Tarun Bharat

कलमठ रोडवर मटका घेणाऱ्या तिघा जणांना अटक

प्रतिनिधी / बेळगाव

कलमठ रोडवर मटका घेणाऱया तिघाजणांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळून 1 हजार 400 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. या तिघा जणांवर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कलमठ रोडवर मटका घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून तिघा जणांना अटक केली. या परिसरात कल्याण मटका सुरु होता. त्यावेळी छापा टाकण्यात आला आहे.

अब्दुल खताल मुजावर (वय 32, रा. माळी गल्ली), उमरशेख (वय 37, रा. कॅम्प), सलमान सलीम मुल्ला (वय 35, रा. कलईगार गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या मटकाबुकींची नावे आहेत. मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवजयंती साजरी

Amit Kulkarni

पृथ्वीराजचा जिल्हाधिकाऱयांकडून सत्कार

Amit Kulkarni

‘लोकमान्य’च्या उचगाव शाखेतर्फे ऋचा पावशे हिचा गौरव

Amit Kulkarni

निपाणीत पोलिसांची तलाठय़ास मारहाण

Patil_p

अलतगा लक्ष्मीदेवी यात्रा पुढील वर्षी भरविणार

Amit Kulkarni

सिद्धरामय्या कोरोना मुक्त, रुग्णालयातून डिस्चार्ज

Archana Banage