Tarun Bharat

कलाकारांच्या मागण्या मंजूर करू : राज्यमंत्री यड्रावकर

Advertisements

वार्ताहर / यड्राव

ज्यांनी कलेसाठी आयुष्य वेचले. दुसर्‍यांच्या आयुष्यातील व्यक्तीरेखा रेखाटताना स्वतःचा विसर पडतो. त्यांची वृद्धावस्था ही बिकट परिस्थीतीत जात आहे. किमान त्यांच्या उतारवयाला औषधपाण्याला हातभार लागण्यासाठी शासनाकडील मानधन मंजुरी व विविध योजना राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघातर्फे कलाकार आणि त्यांचे हक्क आणि अधिकारांसाठी शासनाकडे एकूण २२ मागण्यांचे निवेदन संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील व जिल्हासंघटक रामचंद्र चौगुले यांनी दिले. राज्यात साहित्यीक व चित्रपट, तमाशा, सोंगी भजन, कलापथक, सांस्कृतीक कार्यक्रम, अशा बावन्न कलेचे कलाकार आपल्या अंगातील कलेने आयुष्यभर समाजप्रबोधन करून कला जोपासली आहे. शासनाने यासाठी वयोवृद्ध साहित्यीक व कलाकार मानधन योजना चालू केली आहे. मात्र यामध्ये काही त्रुटी असलेने तसेच कलाकारांचे ऊर्वरित आयुष्यात उपेक्षीत राहू नये त्यासाठी हा सारा खटापोप आहे.

मागण्यामध्ये कलाकारांचे ऑनलाईन मानधन हे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करणात यावे, कोल्हापूर हे कलेचे माहेरघर असलेने येथे सर्वसोयीनीयुक्त कलाभवन उभारण्यात यावे, कलाकारांना शासनाचे ओळखपत्र मिळावे, कलाकारांना मानधन मंजूर करताना त्यांच्या कलेची चाचणी घेण्यात यावी. कलाकाराना “अ” वर्गासाठी सहा हजार, “ब” वर्गासाठी पाच हजार व “क” वर्गासाठी चार हजार मानधन वाढ मिळावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

कलाकारांना उत्पन्नाची अट रद्द करावी, कलाकारांना घरकूल तसेच चार लाख विमा संरक्षण मिळावे, कलाकारांच्या नातवांना उच्चशिक्षण मोफत मिळावे. कलाकारांना बस, रेल्वे व विमान प्रवास मोफत व आरक्षीत असावे, कलाकार मंजूरीचे ऊदिष्ट कोटा हा प्रतीजिल्हा पाचशेहेने वाढ करावी. कला व सांस्कृतीक संस्थाना पाच लाख अनुदान मिळावे. कलाकार मानधन मंजुरीच्या समितीवर अशासकीय सदस्य व अध्यक्ष कलाकारच असावेत. नारायणगावला कलाकेंद्र आहे तसे प्रत्येक जिल्ह्याती स्थापन करावे. अशा एकूण बावीस मागण्या निवेदनाद्वारे मंजूर करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाच्या वतीने अध्यक्ष विलासराव पाटील व जिल्हा संघटक रामचंद्र चौगले यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकती चर्चा करून प्रश्न सोडवू : यड्रावकर

कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाच्या वतीने राज्यातील कलाकारांबाबत करण्यात आलेल्या मागण्यांच्या निवेदनाचा मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये चर्चा करून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन सांस्कृतीक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यानी दिले आहे.

Related Stories

Kolhapur; जिल्ह्यात शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Kalyani Amanagi

कोल्हापूर : मेघोली लघू पाटबंधारे तलाव फुटला, पिके गेली वाहून

Abhijeet Shinde

Kolhapur : ग्रामसेवकाची कोतवालास बघून घेण्याची धमकी; शिरोली ग्रामपंचातमधील प्रकार

Abhijeet Khandekar

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून सामुदायिक अभिवादन

Abhijeet Shinde

गगनबावडा येथे बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक प्रकरणी कारवाई

Abhijeet Shinde

दोन्ही हुतात्मा वीर सुपुत्रांना प्रत्येकी एक कोटी देणार : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!