Tarun Bharat

कलाकार घडवत कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद : तांबोळी

बार्शीत कलाकारांचा मेळा

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी

सांस्कृतिक उपक्रमामुळे बार्शीकरांच्या मनोरंजनासह स्थानिक कलाकारांचा उत्साह वाढीस लागला आहे. नवनवीन कलाकार निर्माण होण्यासाठी मदत झाली आहे. यासह महामारीच्या युध्दजन्य परिस्थितीत स्वत:चा विचार न करता सामाजिक भान ठेवून कलाकारांनी संकटकाळात झटलेले स्वच्छता कर्मचारी, रूग्णसेवा केलेल्या वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अॅड. असिफ तांबोळी यांनी केले.

ए संघराज मुव्हीज यांच्या वतीने आयोजित केलेल्या सिने व नाट्य कलावंतांचा मेळावा, कलाजागर आणि कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. रविवारी दि.२७ रोजी स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे हा उपक्रम पार पडला.

यावेळी बाजार समितीचे सभापती रणीवर राउत, सिने कलाकार रंगा शेठ, काळूराम ढोबळे, आयोजक अश्वकुमार अहिरे, शंकर वाघमारे, सचिन वायकुळे, दत्ता दळवी, गरुडा गुळीक, शांता चौधरी, तृप्ती नाईक, वैष्णवी जगताप, स्नेहल जानराव, प्रिती बांगर, प्रशांत बोगम, स्वानंद देव, कष्णा भिंगारे, कुणाल देशमुख, अनिल भोसले आदी उपस्थित होते.

तांबोळी म्हणाले, कोरोना काळात बार्शीतील जनता घरातच बसून होती. तब्बल आठ-नऊ महिन्यानंतर अंगात विविध प्रकारची कला असलेल्या कलाकारांना शासनाने सादरीकरणाची परवानगी दिली. त्यानंतरचा सर्वांच्या सहभागाने सादर होणारा हा पहिलाच जाहिर कार्यक्रम आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस स्थानिक कलाकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. लोककलावंतांच्या कलाजागर कार्यक्रमात वासुदेवाची वाणी, आराधी जागर, खंडोबा गोंधळ, भारूड, लावणी, मराठी व हिंदी गीत गायन, नृत्य, विविध विनोदी लघु नाटिका, विनोदी नाटक जस्ट गंमत अशा भरगच्च कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात पोलिस कर्मचारी, अत्यावश्यक वैद्यकिय सेवा, पेट्रोल पंप कर्मचारी, शासकिय कर्मचारी, अन्नधान्य वितरण प्रणाली, पत्रकार आदींना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आनंद खुडे व जगदिश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले. अश्वकुमार अहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाना कांबळे, शरणू जवळगी, नागनाथ अडसूळ, गणेश कदम, रविंद्र चकोर, संघराज अहिरे, तात्या चौधरी, आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

‘जवाहर’ ऊस पीक स्पर्धेत चिंचवाड येथील शेतकऱ्यांचे वर्चस्व

Archana Banage

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय मायोपिया आजाराचा धोका

Patil_p

कोल्हापूर : पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी फेरीवाला नोंदणीस सुरुवात

Archana Banage

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख मार्गांचे व पुलांचे तातडीने सुरक्षा लेखा परिक्षण करावे

Patil_p

पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

Archana Banage

स्थानिक गुन्हे शाखेचा डबल धमाका

Patil_p