Tarun Bharat

कलात्मक स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गती मिळेल

प्रतिनिधी / कोल्हापूर

गतीमंद विद्यार्थ्यांना चेतना संस्थेत अनेक प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. शिवसेना हा सामाजिक पक्ष असल्याने युवा सेनेच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. अशा कलात्मक स्पर्धांच्या माध्यमातूनच गतीमंद विद्यार्थ्यांना गती मिळेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

युवा सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या गतीमंद विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापुरातील 9 महिलांचा सत्कार शिक्षणमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांनी गतीमंद विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या चित्रकलेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी माने यांना आपल्या शाळेत येवून त्यांनी तयार केलेले आकाशकंदीलसह इतर वस्तू पाहण्याची विनंती केली.

शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, गतीमंद विद्यार्थ्यांना गती देण्याची चळवळ देशपातळीवर राबवली पाहिजे. युवा सेनेने गतीमंद विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांना एक वेगळा आनंद दिला आहे. त्यांच्या कला पाहून आपण कोठे आहोत, असा प्रश्न निर्माण होतो. गतीमंद विद्यार्थ्यांना कशा पध्दतीने वागवायचे, हे ठरवून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. युवा सेना जिल्हाप्रमुख मनजित माने यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, स्मिता सावंत, किरण पडवळ, वैभव जाधव, किर्तीकुमार जाधव, शुभम मोरे, मंगेश चिताळे, नितीन पाथरवट, तुकाराम लाखे आदी उपस्थित होते.

Related Stories

विशेष मागासवर्ग आयोग गठित करणे ही धूळफेक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कोरोनाची ‘एंट्री’

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच

Archana Banage

पेरणी साधण्यासाठी कुरीचे ‘ जू ‘ तरुणांच्या खांद्यावर

Archana Banage

महापालिका क्षेत्रातील मंडपांची होणार तपासणी

Archana Banage

…अन्यथा सरकारनं रस्त्याच्या लढाईला तयार राहावं; FRP वरुन राजू शेट्टी आक्रमक

Abhijeet Khandekar