Tarun Bharat

कलाश्री समुहाच्या चौथ्या सोडतीचे आनंद चव्हाण ठरले मानकरी

प्रतिनिधी /बेळगाव

कलाश्री उद्योग समुहाच्या चौथ्या सोडतीत शाहूनगर येथील आनंद वेंकटेश चव्हाण हे भाग्यवान विजेते असून ते 21 हजार रुपयांच्या रोख बक्षिसाचे मानकरी ठरले.

कलाश्री उद्योग चौथ्या सोडतीप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नारायण बाबर, अंजली ठोंबरे, दीपिका मोटार, अशोक पिंगट, माधुरी खानापुरी, कलाश्रीचे संचालक प्रकाश डोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रकाश डोळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते चौथ्या सोडतीचा ड्रॉ काढण्यात आला.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. डिलर्स रामलिंग झेंडे (हारुरी), कल्पना नेसरगी (मच्छे), सोमनाथ देसाई (कुसमळी), प्रियांका नाकाडी (बिडी), गुलाबी पाटील (शगनमट्टी) यांचा सत्कार करण्यात आला. सोडतीवेळी उपस्थित असलेल्या नितीन नंदगडकर, राजेश्री पाटील, मोहन पाटील, सोमनाथ देसाई, सोनाली येळ्ळूरकर या 5 सभासदांना गिफ्ट ड्रॉ देण्यात लागला.

कलाश्रीच्या या सोडतीचा विस्तार गोवा, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, राजापूर, चिपळून रत्नागिरी, अलीबागसह सिंधुदुर्ग कोकणमध्ये झाला आहे. टी. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

हुतात्म्यांच्या वारसदारांना शिवसेनेचा मदतीचा हात

Amit Kulkarni

कोगनोळीत अपघातात वृद्ध जागीच ठार

Patil_p

अल्-मतीन एज्युकेशन ट्रस्टतर्फे लसीकरण शिबिर

Amit Kulkarni

जिल्हय़ातील साडेचार लाख जणांचा अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni

मनपातील बैठकीत कोणती ‘डील’?

Omkar B

सर्वच क्षेत्रात विद्यार्थ्यांनी कौशल्य सिध्द करावे

Amit Kulkarni