प्रतिनिधी / पणजी


ताळगाव येथील कला निकेतन सांस्कृतिक मंडळातर्फे देण्यात येणारे यावर्षीचे राज्यस्तरीय गोमंत नाटय़भूषण पुरस्कार, गोमंत साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
अभय जोग (वेळगे-डिचोली), जयेंद्रनाथ यशवंत हळदणकर (आराडीबांध तिसवाडी), राजेंद्र नृसिंह फडते (आखाडाöतिसवाडी), दत्ताराम हरिश्चंद्र ठाकूर (हरमल-पेडणे) यांना ‘गोमंत नाटय़भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
मराठी साहित्यिक तुळशीदास काणकोणकर (धाकटेभाट डोंगरी-तिसवाडी), यांना ‘गोमंत साहित्यभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शेखर खांडेपारकर यांनी दिली. गोमंतकाच्या नाटय़क्षेत्रात व साहित्यक्षेत्रात भरीव योगदानाबद्दल या व्यक्तींची निवड मंडळाच्या निवड समितीने केली आहे. सन्मानपत्र व आकर्षक स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार 6 मार्च सायं. 4 वा. पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणाऱया सोहळय़ात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.