Tarun Bharat

कला- संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचे 2021-22 सालचे राज्य युवा सृजन (नवसर्जन- चेतना) पुरस्कार जाहिर झाले असून कला व साहित्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या 9 युवक- युवतींना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनायालयातर्फे कला क्षेत्रातील नाटक, तियात्र, संगीत, साहित्य, चित्रकला, छायाचित्रण, लोकसंगीत, लोककला, हस्तकला, भजन, किर्तन, चित्रपट आदी विविध प्रकारांत विशेष व उल्लेखनिय कार्य करीत लौकीक संपादन करणाऱया ज्येष्ठांना दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित केले जाते. या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱया युवा वर्गालाही प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षापासून खात्यामार्फत या प्रदेशातील युवा वर्गालाही युवा सृजन पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. या पुरस्कारासाठी 45 वर्षाखालील व्यक्तिंची निवड केली जाते.

या वर्षी (2021-22) युवा सृजन पुरस्कार प्राप्त मान्यवर खालीलप्रमाणे आहेत.

  • फादर मायरॉन जेसन बार्रेटो, काणकोण (साहित्य)
  • समिर वायंगणकर, पेडणे (संगीत)
  • विशाल बाबली गांवस, सत्तरी (नाटक)
  • अगीमा फर्नांडिस, सालसेत (तियात्र)
  • राजतिलक नाईक, बार्देश (चित्रकला/छायाचित्रण)
  • प्रेमनाथ केरकर, फोंडा (लोककला)
  • वनिता कुर्तीकर, फोंडा (नाटक)
  • संदेश सोनु नाईक, तिसवाडी (चित्रकला)
  • सिद्धी सुर्लकर उर्फ पिळगांवकर, फोंडा (संगीत)

पुरस्कारप्राप्त व्यक्तिला रोख रु. 25,000 हजार रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान केले जाते. या पुरस्कारांचे वितरण खास सोहळ्यात होणार असून वितरणाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!