Tarun Bharat

कलेतून संदेश देणारे कलाकार आंदोलनाच्या पवित्र्यात

कोरोना काळात चित्रीकरण बंद असल्याने रोजगारापासून वंचित, कलाकार जगला तरच कला जगेल

अहिल्या परकाळे / कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून चित्रपटगृह, नाट्यगृह तसेच मालिका, चित्रपटांचे चित्रिकरण बंद आहे. परिणामी चित्रपट, मालिका, पथनाट्य, नाटक, गाण्यातून सामाजिक संदेश देऊन जनतेसह सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे कलाकार  बेरोजगार  झाले आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करीत चित्रिकरणास परवानगी मागूणही मिळत नसल्याने पडद्यामागच्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार दरबारी प्रश्न मांडूनही सुटत नसल्याने कलाकारांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. कलेमून सामाजिक हिताचा संदेश देणाऱया जवळपास 10 लाख कलाकारांनी संघटित होऊन आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. ही धडपड केवळ जगण्यासाठीची आहे.

राज्यभरात चित्रिकरणास परवानगी नसल्याने कलाकारांना घरात बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मराठीतील निर्मार्ते, दिग्दर्शक कमी बजेटमध्ये चित्रिकरण करतात. त्यामुळे इतर मोठ्या बजेटच्या मालिका, चित्रपटांप्रमाणे इतर राज्यात चित्रिकरणासाठी जाणे अशक्य आहे. इतर राज्यात जाऊन ज्यादा पैसे खर्च करून चित्रिकरण केले तरी चित्रपटगृहे बंद असल्याने चित्रपट प्रदर्शितच होत नाही. त्यामुळे खर्च केलेला पैसा कसा काढायचा असा सवाल निर्मार्ते व दिग्दर्शकांसमोर पडला आहे. काही कलाकार चित्रिकरणासाठी परराज्यात गेले आहेत त्यांना आपल्या कुटुंबियांपासून दूर राहावे लागत आहे. कुटुंबियांच्या सुख-दु:खात सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याची चर्चा कलाकारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण मालिका, चित्रपटाचे चित्रिकरण एखाद्या रिसॉर्टमध्ये करण्यास परवानगी मागण्यात आली आहे. परंतू मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कलाकारांसाठी काम करीत असले तरी मर्यादा येतात. येथे सर्व प्रकारच्या कलाकारांची नोंदणी नाही. त्यामुळे राज्यभरातील विविध प्रकारच्या कलाकारांच्या 35 संघटनांमधील जवळपास 10 लाख कलाकार एकत्रित करून कलाकारांचे युनियन तयार करण्याचा प्रयत्न कलाकारांकडून सुरु आहे. या युनियनच्या माध्यमातून सरकार दरबारी कलाकारांचे दु:ख मांडून मागण्या मंजूर करून घेतल्या जाणार आहेत. सरकारने कलाकारांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली तर मतदानाच्यावेळी 10 लाख कलाकारांच्या युनियनची ताकद सरकारला दाखवण्याच्या हालचाली सुरू आहेत. पडद्यामागचे कलाकार आणि तंत्रज्ञांना सेलिब्रिटी व निर्मात्यांकडून महिन्याचे अन्नधान्य पुरवले जाते. परंतू याला मर्यादा येतात, म्हणूनच एखाद्या रिसॉर्टवर चित्रिकरणास परवानगी दिली तर कोणावरच उपासमारीची वेळ येणार नाही, अशा भावना कला क्षेत्रातून उपस्थित केल्या जात आहेत.

सरकारने चित्रिकरणास परवानगी द्यावी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. सरकारी कार्यालयाप्रमाणे चित्रपट क्षेत्रासह इतर क्षेत्रातही नियमांचे पालन करीत काम करता येते. त्यामुळे सरकारने सर्वेक्षण करून चित्रिकरणासह इतर क्षेत्रातही काम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा लोक अन्नाविना मरतील यासारखे दुसरे दुर्दैव नसेल. 

Related Stories

पायल रोहतगी आणि जीशान खानमध्ये जुंपली

Archana Banage

मावळ्यांनो गडसंवर्धनाच्या कामाला लागा

datta jadhav

ईडी कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ म्हणून शिवसैनिकांची बॅनरबाजी

Tousif Mujawar

ठाकरेंनी जनतेला सांगावे की, मीच सांगितले तुम्ही निघून जा…

Kalyani Amanagi

अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घराचीही झाडाझडती

datta jadhav

कोल्हापूर : कबनुरात उद्यापासून कडक लॉकडाऊन

Archana Banage