Tarun Bharat

कल्मेश्वर सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Advertisements

वार्ताहर/ सांबरा

बसवण कुडची श्री कल्मेश्वर को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थांनी चेअरमन परशराम बेडका होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कमलाकांत उपाध्ये यांच्याहस्ते फोटोपूजन करण्यात आले. भारती जोडगुंडे व ललिता उपाध्ये यांनी उपस्थितांचे स्वागत व अहवाल वाचन केले. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन परशराम बेडका यांनी संस्थेला 12 लाख 14 हजार 353 रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. यावेळी कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची रात्रंदिवस सेवा केलेले गावातील डॉ. मल्लाप्पा बाबू हम्माण्णाचे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक यल्लाप्पा मुचंडीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

सभेला सर्व संचालक, सभासद, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. संचालक संभाजी गिरी यांनी आभार मानले.

Related Stories

‘बिजली मल्ला’च्या निधनाने कुस्तीची अपरिमित हानी

Amit Kulkarni

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनपटावर कीर्तन

Amit Kulkarni

शुक्रवारी जिल्हय़ात 1080 रुग्ण पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

बळीराजा पुन्हा सुगी हंगामाकडे वळला

Patil_p

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Amit Kulkarni

कार्यकर्त्यांवरील राजदोहाचा गुन्हा मागे घ्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!