Tarun Bharat

कल्याण पत्नीने घटस्फोटाची याचिका घेतली मागे

मांत्रिकाच्या प्रतापामुळे विखुरलेले दांपत्य पुन्हा येणार एकत्र

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटकातील प्रसिध्द सीनेगीतकार के. कल्याण यांच्या पत्नीने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे मांत्रिकाच्या प्रतापाने विखुरलेले दांपत्य पुन्हा एकत्र येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

कल्याण यांची पत्नी अश्विनी यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन घटस्फोटासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहे. यासाठी पोलीस अधिकारी, मानसोपचारतज्ञ, वकील आदींनी प्रयत्न केले आहेत. भोंदू मांत्रिकावर विश्वास ठेवून जीवभयाने अश्विनी यांनी कल्याण यांच्यापासून विभक्त होण्याचे ठरवून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

शिवानंद बसवराज वाली (वय 38, रा. बुदिहाळ, ता. बिळगी, जि. बागलकोट) या भोंदू मांत्रिकाविरुध्द के. कल्याण यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. आपली पत्नी, सासू, सासऱयांचे अपहरण करुन त्याने मालमत्ता हडप केल्याचा आरोप करण्यात आला होता. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी शिवानंदला अटक करुन सुमारे 1 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

कल्याण यांच्यापासून तुमच्या जीवीताला धोका आहे, असे सांगत या भोंदू मांत्रिकाने दांपत्यात वितुष्ट निर्माण केले होते. या भोंदूवर विश्वास ठेवून कल्याण यांची पत्नी अश्विनी यांनी मांत्रिकाला मोठी रक्कम दिली होती. आपल्या वडिलांची मालमत्ताही त्याच्याकडे सोपविली होती. इतकेच नव्हे तर घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. आता हा अर्ज त्यांनी मागे घेतला आहे.

Related Stories

महापुरुषांची विटंबना करू नका

Amit Kulkarni

बारावी परीक्षेला आजपासून प्रारंभ

Amit Kulkarni

तालुक्याच्या विविध भागात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स, विश्रृत स्ट्रायकर्स विजयी

Patil_p

अवजड वाहतूक बंदी काटेकोरपणे

Omkar B

फिरगण्णवर दाम्पत्य यजमान पदाचे मानकरी

Patil_p