उचगाव : सुळगा (हिं.) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कल्लेहोळ येथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सुनिल जाधव सेवा केंद्रातर्फे सत्कार केला. सत्कारप्रसंगी सुनिल जाधव सेवा केंद्राचे प्रमुख सुनिल जाधव, ग्रा. पं. सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्रामपंचायत सदस्य हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेवून निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा. सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेवून विकासाचे नियोजन करावे. यावेळी कल्लेहोळ ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य अनिल जोतिबा पाटील, रमेश यशवंत खन्नूकर, महेश मनोहर सुतार, लक्ष्मी संजय वेताळ, अश्विनी परशराम खन्नूकर, अलका अरुण ल्हामजी, लक्ष्मी शिवाजी नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठी युवा मोर्चाचे आणि सुनिल जाधव सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राहुल भातकांडे, प्रविण पाटील, पिराजी वेताळ, परशराम मन्नोळकर, कृष्णा कदम, राजू चंदगडकर, नागेश मायाण्णाचे, जोतिबा दौलतकर उपस्थित होते.


previous post