Tarun Bharat

कळंगूटमध्ये आयपीएल सट्टेबाजांना अटक

पंधरा मोबाईलसह तीन लॅपटॉपही जप्त

प्रतिनिधी/ म्हापसा

विदेशात खेळल्या जाणाऱया आयपीएल स्पर्धावरून गेल्या महिन्याभरात बार्देशातील किनारीभागात सट्टेबाजी करणाऱया अनेकांना कळंगुट पोलिसांकडून अटक करण्यात आली, मात्र, अद्याप याभागातील सट्टेबाजी थांबण्याचे नाव घेत नाही. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात पाच परप्रांतीय सट्टेबाजांना पंचवीस हजार रुपये तसेच 15 महागडे मोबाईल संच आणी तीन लॅपटॉपसह अटक केली.

 ही कारवाई शनिवारी मध्यरात्री बागा-कळंगुट येथील तवा-पेलेस या नामांकित हॉटेलच्या रुमवर करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी दिली.

   मनोज थडानी (39, इंदोर), बंटी डांगी (32, इंदोर), चिंटु धोयध्याय (21, इंदोर), रुपेश सिंग (32, मुंबई), जगदीश नेपाळी (47, नेपाळ) यांना कळंगुट पोलिस पथकाकडून रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

 सिएसके चेन्नई व रॉयल चेलेजर्स (बंगळुरु ) यांच्यात खेळल्या जाणाऱया टीमवरुन ही सट्टेबाजी चालली होती. आयपीएल सट्टेबाजीत समावेश असलेल्यांच्या विरोधात कळंगुट पोलिसांकडून करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे. सर्व पाचही आरोपींची सध्या स्थानिक पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईत कळंगुटचे पोलिस निरीक्षक नॉलास्को रापोझ, यांच्या समवेत उपनिरीक्षक राजाराम बागकर, हवालदार विनोद नाईक, विनय श्रीवास्तव आदींनी भाग घेतला.

Related Stories

पिसुर्ले शेतकरी संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा

Amit Kulkarni

आयएसएल स्पर्धेत ओडिशा-एटीके बागान बरोबरीत

Patil_p

वाळपई नगरपालिका मंडळाच्या कारभारावर समाधान

Patil_p

खाण लीजांची लिलावाची दुसरी फेरी 20 एप्रिलपासून

Amit Kulkarni

बेताळभाटी येथील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश कायम

Amit Kulkarni

बोंडला प्राणी संग्रहालय पर्यावरण व पर्यटनासाठी पुरक

Amit Kulkarni
error: Content is protected !!