Tarun Bharat

कळंगूटमध्ये भाजपच विजयी होणार

गुरुदास शिरोडकर यांचा दावा

प्रतिनिधी /म्हापसा

 मायकल लोबो यांनी आपल्या आमदारकीच्या कारकीर्दीत लोकांना त्रास केले आहेत. कार्यकर्त्यांना पिडले व सर्वसाधारण लोकांचे विषय बाजूला करून स्वतःचे राजकारण केले. त्यांना लोक कंटाळले आहेत. आज ते कोणत्याही पक्षात जावोत, कळंगुटची जनता त्यांना कधीच जवळ करणार नाही, अशी माहिती भाजपचे संभाव्य उमेदवार गुरुदास शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते स्ट्राँग आहेत. आम्ही देशप्रेमी नागरीक व मोदीची देशसेवा लोकांनी उचलून धरली आहे. त्यामुळे कळंगूट मतदारसंघात भाजपशिवाय अन्य पर्याय राहिला नाही,  अशी माहिती शिरोडकर यांनी दिली.

1998 साली आम्ही प्रथम उमेदवार कळंगुटमध्ये रिंगणात ठेवला त्यावेळेपासून आजपर्यंत आम्ही भाजपसाठी कार्य केले. मात्र लोबोनी आमच्यावर पाणी फेरले. आज लोबो पक्ष सोडून गेले आहेत. 2007 साली आपल्यास ऑफर होती मात्र मी ती धुडकावली असल्याचे ते म्हणाले. लोकांच्या विरोधात त्यांनी फारकत घेतली ती दुसऱया पक्षात जाण्यासाठी नाही. आपण जरी पक्ष सोडला तरी लोबो पक्ष सोडून गेल्याने आपण पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहे असे †िशरोडकर म्हणाले.

भाजपच्या तिकीटासाठी आपला दावा आहे काय? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते व मतदार हे भाजपबरोबरच राहणार कारण तेथे आज लोबो नाही आहेत. आणि कार्यकर्त्यांशी आपण यापूर्वीच संपर्क साधला आहे. मला पक्षाने तिकीट दिली तर कार्यकर्त्यांनी यापूर्वीच आपल्यास स्पष्ट केले आहे. गुरुदास आता मागे सरायचे नाही. घरोघरी आपल्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तसे झाल्यास भाजपचा तिसऱयांदा कळंगुटमध्ये झेंडा फडकावेल यात शंकाच नाही असे †िशरोडकर म्हणाले.

लोबो गेल्याने काहीच पोकळी निर्माण झाली नाही. भाजपचे मतदार कार्यकर्ते सक्षम आहेत. उलट कार्यकर्ते वाढत आहेत. सुंटीवाचून खोकला गेला अशी परिस्थिती झाली आहे. प्रामाणिक एकनिष्ठ भाजपची तत्वे व विचार घेऊन मिळाला तर तोच विजयी होईल. असे शिरोडकर यांनी सांगितले.

तिसऱयांदा लोबो नको असा सूर येत आहे. सत्तेत राहून त्यांच्याकडून काहीच विकासकामे झाली नाहीत त्यामुळे ते शंभर टक्के आऊट आहे. आपले मतभेद आमदाराकडे झाले ते गावच्या लोकांना सोडून बाहेरील लोकांना महत्त्व देत होते. पक्षाकडे आपले काहीच वाईट नाही. भाजपचाच उमेदवार येथे निवडून येईल असे ते म्हणाले.   तृणमूल पक्षाचा कळंगुटमध्ये काहीच फरक पडणार नाही. आम्हाला दोन तास पाणीही येत नाही ही शोकांतिका आहे. आज कळंगुटमध्ये गुन्हेगारी वाढली त्याना आमदार लोबोच जबाबदार असल्याचे  शिरोडकर म्हणाले.

Related Stories

निलंबित अधिकाऱयांची नावे जाहीर करा

Amit Kulkarni

काणकोणात मास्क न वापरता फिरणाऱया 60 जणांना दंड

Omkar B

शिरडीत ‘लॉकडाऊन’, शिरगावात ‘कोरोन्टाईन’!

tarunbharat

बारमध्ये दादागीरी करणारे आठ पोलीस निलंबित

Amit Kulkarni

शारदा मंदीरला यू-14 बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय दुहेरी जेतेपद

Amit Kulkarni

सुर्ला मल्लकार्जुन मंदिरात आज दसरा उत्सव

Amit Kulkarni