Tarun Bharat

कळंगूट येथील व्यक्तीच्या खून प्रकरणी तरुणास अटक

पोलीस कोठडी, जमिनीवर डोके आपटून खून केल्याचा आरोप

प्रतिनिधी /म्हापसा

सावतावाडा-कळंगूट येथील जोजफ फर्नांडिस (वय 57) यांचे डोके जमिनीवर आपटून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणांवरून त्याच भागातील नितीन गडेकर (38) या संशयित तरुणास कळंगूट पोलिसांनी रितसर ताब्यात घेऊन अटक केली आहे.

  या प्रकरणी कळंगूट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावतांवाडा कळंगूट येथील नितीन दीना गडेकर हा रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आपल्या पुर्वाश्रमीच्या पत्नी असलेल्या एलिझाबेथ फर्नांडिस यांना या भागात चालवत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये भेटावयास आला होता. दरम्यान, यावेळी त्यांच्यात असलेल्या पुर्ववैमनस्यातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी गडेकर यांनी एलिझाबेथ यांच्या केसांना धरून जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, एलिझाबेथचे किंचाळणे ऐकून तेथे धाव घेतलेल्या जोजफ फर्नांडिस यांच्यावर नितीनने जोरदार हल्ला चढवित त्यांनाही लाथाबुक्मयांनी मारहाण केली. यावेळी त्यांचे जमिनीवर डोके आपटून गंभीर जखमी केले.

 दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळंगूट पोलीस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत तात्काळ जखमी जोजफला उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठविले. परंतु या मारहाणीत डोक्मयाला जबर मार बसलेल्या जोजफचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱयांच्या सूचनेनुसार जोजफचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या शवागारात पाठवून दिला असून संशयित नितीन गडेकर याला खुनाच्या आरोपाखाली रितसर अटक करून कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नोलास्को रापोझ करीत आहेत.

Related Stories

पेडणे सार्व. गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन

Patil_p

हिमालयाची उंची आणि समुद्राची खोली यांचा समन्वय राखून कार्य करणार

Patil_p

गोमंतकीयांचा पक्ष बनण्याचे तृणमुलचे ध्येय

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीच्यावतीने लोकमान्य गणरंग चित्रकला स्पर्धा

Amit Kulkarni

राज्यात गुन्हेगारी वाढली

Amit Kulkarni

साई, वेर्णा वेटरन्स संघाना फुटबॉलचे विजेतेपद

Amit Kulkarni