Tarun Bharat

कळंगूट येथे दगडाने ठेचून फेफरिनो बरेटोचा खून

मयत हळदोणा येथील अमलीपदार्थ देवाणघेवाणीच्या पैशावरुन वादाचा संशय

प्रतिनिधी/ म्हापसा

बागा येथे मलनिःसारण प्रकल्पाजवळ तथा चंद्रकांत कॉटेजपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी हळदोणा येथील जेफरिनो बर्रेटो (45) याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मृतदेहाच्या ठिकाणी खूनासाठी वापरण्यात आलेल्या विटा पोलिसांना आढळून आला आहे. प्रथमदर्शनी या खूनात एकापेक्षा अधिक संशयितांचा समावेश असल्याचे दिसून येते. रस्त्यावर आधारकार्ड, लायसन्स आदी कागदपत्रे, हेल्मेट, दुचाकीची चावी, भ्रमणध्वनी आदी पडलेले आढळून आले आहे. या खूनामागे नायजेरियन नागरिकाचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून कळंगूट पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को सपोझ यांनी संशयितांना शोधून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

अमलीपदार्थाच्या देवाणघेवाणावरुन हा खून झाल्याचे बोलले जात आहे. तर गिरी येथे काम करणारा वेटर रात्री उशिरा बागा येथे अज्ञातस्थळी कसा पोहोचला याबाबतची उलटसुलट चर्चा सुरु आहे. घटनास्थळावरुन एक महिला जाताना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहे. ती महिला कोण होती याचा तपास पोलीस करीत आहेत.

खून झाला त्या ठिकाणावरुन महिला गेल्याचे सीसीटिव्हीत आढळले

ज्या ठिकाणी खून झाला ती जागा सामसूम असून मुख्य रस्त्यावरुन सुमारे 200 मीटर आत आहे. तेथे लोकवस्ती नसून तेथे मलनिःसारण प्रकल्प आहे. बाजूला दोन घरे असून भाडय़ाने काहीजण राहतात. त्याठिकाणाहून हाकेच्या अंतरावर चंद्रकांत कॉटेज आहे. ज्यावेळी खून झाला त्याचवेळी तेथून एक महिला जाताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे या खुनाबाबत कळंगूटमध्ये उलटसुलट चर्चा दिवसभर सुरु होती.

रात्री उशिरा जेफरिनो घरी परतत असे

मयत जेफरिनो बर्रेटो हा म्हापसा गिरी येथे येल्लो फ्लॉवर या फास्ट फूडमध्ये वेटर कामाला होता. तेथे रात्रीच्या वेळी तो काम करायचा तर सकाळी म्हापसा आरटीओ गाडी शिकविणाऱयाकडे काम पाहत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. बरेटो रात्री 2 ते 3 वा.च्या दरम्यान फास्टफूट बंद झाल्यावर घरी परतत असे. मात्र गुरुवारी रात्री तो घरी आला नव्हता, अशी माहिती त्याच्या काकाने पत्रकरांनी दिली. जेफरिनोच्या खुनाची बातमी कळंगूट पोलिसांनी दुपारी घरी दिली. जेफरिनोला अन्य दोघे भाऊ असून एक म्हापसा तर दुसरा गुजरातला असतो. दोन विवाहित बहिणी व आई असा त्याचा परिवार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दगडाने ठेचून खून केल्याचा संशय

हडफडे येथून बागाच्या दिशेने जाताना पूल काढल्यावर बागा येथे डाव्या बाजूला आतमध्ये छोटा रस्ता आहे. त्याला लागूनच तेथे चंद्रकांत कॉटेज असून तेथून दहा मिटरच्या अंतरावर जॅफरीनो बरेटो (45, रा. हळदोणा) याचा मृतदेह सकाळी आढलेला आहे. ज्या ठिकाणी मृतदेह होता तेथे त्याचे फोटो, लायसन्स, पाकीट, भ्रमणध्वनी आदी कादगपत्रे सर्वत्र पडलेली आढळून आली आहे. तसेच सर्वत्र रक्त सांडलेले होते. मृतदेहापासून चार मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला हेल्मेट, दुचाकीची चावी, दुसऱया बाजूला मयताची डिओ गाडी तर बाजूला झाडाखाली  फसिनो दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी मयताची डिओ क्र. जीए 03 एस 2881 या लाल कलरच्या गाडीमध्ये अन्य एक भ्रमणध्वनी, जॅकेट व शर्ट आढळून आला आहे. तर दुसऱया फसिनो दुचाकी क्र. जीए 03 एन 8556 ही रस्त्याच्या बाजूला झाडा खाली आढळून आली आहे. मृतदेहाच्या डोक्याचा एक भाग तुटून बाजूला पडला होता व सर्वत्र रक्त सांडले होते. मृतदेहाच्या बाजूला विटा, दगड तुटलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे घटनास्थळी प्रथमिक दर्शनी आढळून आले आहे.

 

Related Stories

श्री देवी महामाया कालिका संस्थानात नवरात्रौत्सवानिमित्त मखरोत्सव

Amit Kulkarni

आपल्या स्वार्थापोटी भाजपवर टिका करणे आम्ही खपवून घेणार नाही- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Amit Kulkarni

आकाशी झेप घेण्यास मोप सज्ज!

Patil_p

रणमाले महोत्सवामुळे पारंपरिक कलेला नवीन आयाम

Amit Kulkarni

गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश सरकारने त्वरित रद्द करावा

Patil_p

चांदेल – हसापूर पंचायतीचे सरपंच संतोष मळीक यांचा सरपंचपदाचा राजीनामा

Amit Kulkarni