Tarun Bharat

कळंबस्ते पोल्ट्रीतून खरेदी केलेल्या कोंबडय़ांनी अंडे देणे केले बंद!

Advertisements

प्रतिनिधी / चिपळूण

कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीतून खरेदी करून नेण्यात आलेल्या कोंबडय़ा पंधरा दिवसांनंतर अंडे देत नसल्याची तक्रार बचत गटांनी पंचायत समितीच्या सभापती धनश्री शिंदे यांच्याकडे केली आहे. अंडय़ांचे उत्पन्न काढून घेऊन या कोंबडय़ा माथी मारण्यात आल्या असल्याचा आरोप होत असून यामध्ये बचत गटांची फसवणूक झाल्याचे गटांचे म्हणणे आहे.

   गेल्या काही दिवसांपासून कळंबस्ते पोल्ट्रीतील कोंबडय़ांचे चोरी प्रकरण पंचायत समितीमध्ये गाजत आहे. सुरूवातीला चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोल्ट्रीच्या अधिकाऱयाने दीड लाखाची रक्कमही भरणा केली होती. या प्रकरणाची सध्या पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे. असे असतानाच आता या पोल्ट्रीतून बचत गटानी खरेदी केलेल्या कोंबडय़ा आता अंडे देत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कळंबस्ते पोल्ट्रीतील कोंबडय़ांचे प्रकरण अधिक रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत,

   या पोल्ट्रीतून एका कोंबडीची किंमत 266 रूपये याप्रमाणे दर ठरवून त्यानुसार प्रत्येक बचत गटाला 50 याप्रमाणे पाच बचत गटांना 250 कोंबडय़ांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार खरेदी केलेल्या कोंबडय़ा बचत गटांनी नेल्यानंतर पंधरा दिवस त्या नियमितपणे अंडी देत होत्या. मात्र त्यानंतर अंडी देणे बंद केले. आणखी काही दिवस वाट पाहून बचत गटाच्या महिलांनी सभापती शिंदे यांच्याशी संपर्क साधत या बाबतची माहिती दिली. यानंतर सभापती शिंदे यांनी या बाबत पोल्ट्री अधिकाऱयांशी संपर्क साधून याची माहिती दिली असता कॅल्शियम कमी झाले असेल म्हणून अंडी देत नसाव्यात, असे उत्तर दिले. मुळातच एक पक्षी 50 अथवा 75 आठवडय़ापर्यत अंडी देत असतो. त्यामुळे बचत गटांना देण्यात आलेल्या पक्ष्यांकडून अंडय़ांचे उत्पन्न काढून मगच दिले गेले असावे. त्यामुळेच ते अंडी देत नसावेत, अशी शक्यता काहींनी वर्तवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचीही चौकशी सुरू झाली आहे.

Related Stories

आणखी 5 एक्सप्रेसना एक अतिरिक्त डबा वाढवला

Patil_p

वेंगुर्ले आगारातून मठमार्गे जाणाऱ्या एस.टी.बस बुधवारपासून बाजारपेठ-मारूती स्टाँप मार्गे

Anuja Kudatarkar

रत्नागिरीतही लसीकरणाची ‘रिऍक्शन’!

Patil_p

जिह्यात दिवसाला 3 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या

Patil_p

अमेरिकेच्या कोरोना व्हॅक्सिनसाठी रत्नागिरीतून जातोय कच्चा माल !

Patil_p

टीका करणारे निवडणुकीत पडतात

Patil_p
error: Content is protected !!