Tarun Bharat

कळंबस्ते शासकीय पोल्ट्रीतून 450 कोंबडय़ा चोरीस!

ऑनलाईन सभेत अधिकाऱयांनीच दिली माहिती,

राजेंद्र शिंदे/ चिपळूण

चिपळुणातील कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीतून तब्बल 450 कोंबडय़ा चोरीस गेल्या आहेत. सोमवारी झालेल्या पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेत पशुसंवर्धनसंदर्भातील प्रश्नावर खुद्द पोल्ट्री अधिकाऱयाने याबाबतची माहिती दिली आहे. यापुर्वी खर्च भागवण्यासाठी पोल्ट्रीतील 800 कोंबडय़ा विकल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यातील 350 कोंबडय़ांचीची विक्री केल्याचे या अधिकाऱयाने स्पष्ट पेले आहे. दरम्यान, या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीमध्ये अधिकाऱयांना बोलावण्यात आले आहे.

   शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाला उभारी मिळावी यासाठी कळंबस्ते येथे जिल्हा परिषदेने पोल्ट्री सुरू केली आहे. या पोल्ट्रीत सुधारित जातीच्या कोंबडय़ांची पैदास होऊ लागल्याने ती शेतकरीवर्गासाठी आधार पेंद बनली. जिल्हा परिषदेच्या मालकीची ही जिल्हय़ातील एकमेव पोल्ट्री असून सुमारे 10 हजार पक्षी ठेवण्याची क्षमता या पोल्ट्रीत आहे. शासकीय पोल्ट्रीस वर्षाकाठी कोंबडीचे खाद्य, वीज बिल यासाठी सुमारे 20 लाख खर्च येत आहे.  मात्र गेल्या काही वर्षापासून केवळ तीन-चार लाखाचेच अनुदान मिळत असल्याने ती चालवणे अवघड बनले आहे. गेल्या 4 माहिन्यांत अनुदान न मिळाल्याने ठेकेदाराने खाद्याचा पुरवठा बंद केला. काही अधिकाऱयांनी स्वत: खर्च करुन खाद्य उपलब्ध करुन दिले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खर्च भागवण्यासाठी 800 कोंबडय़ा विकण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांकडून देण्यात आली होती. मात्र पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्या चाणाक्षपणामुळे यातील गौडबंगाल पुढे आले आहे.

  कोरोना संसर्गामुळे येथील पंचायत समितीची मासिक सभा इतिहासात प्रथमच सोमवारी ऑनलाईन घेण्यात आली. या सभेत पोफळीचे पंचायत समिती सदस्य साळवी यांनी कळंबस्ते पोल्ट्रीतील कोंबडय़ांच्या विक्रीसंदर्भात विचारणा केली असता तेथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एम. टी. करावडे यांनी 800 कोंबडय़ांपैकी 350 कोंबडय़ांची विक्री झालेली असून उर्वरीत कोंबडय़ा चोरीस गेल्याचे सांगितले. त्यांच्या या उत्तराने सदस्यही अवाप् झाले. मात्र सभा ऑनलाईन असल्याने आणि त्यातच माहिती देताना अधिकाऱयांची उडालेली भंबेरी पाहून या संदर्भात गुरूवारी पंचायत समितीत सभापती धनश्री शिंदे, उपसभापती पांडुरंग माळी, सदस्य बाबू साळवी, गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्या उपस्थितीत खास बैठक होणार आहे. यात संबंधित अधिकाऱयांना माहिती देण्यास उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.

  या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर मिळालेली माहिती धक्कादायक आहे. 1 सप्टेंबर रोजी पोल्ट्रीच्या अधिकाऱयानी सभापती शिंदे यांच्याशी अनुदानासंदर्भात संपर्क साधून केंबडय़ा वाटपासंदर्भात चर्चा केली. एका कोंबडीची किंमत 266 रूपये असून बचत गटांना प्रथम प्राधान्य असल्याचे सांगितले. यानंतर सभापतीनी बचत गटांशी संपर्क साधला. त्यानुसार प्रत्येक गटाला 50 याप्रमाणे 350 कोंबडय़ांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी प. स. सदस्य साळवी पोल्ट्रीत गेले असता सर्व 800 कोंबडय़ांचे वाटप झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावर साळवी यांनी सभापतीना संपर्क साधून या बाबत माहिती दिल्यानंतर माहितीत तफावत असल्याचा प्रकार उघडकीस आला. सुरूवातीला 350 आणि त्यानंतर 800 कोंबडय़ा झाल्याने नेमका प्रकार तरी काय, या बाबतची अधिक माहिती साळवी यांनी गोळा करून मासिक सभेत प्रश्न उपस्थित केला आणि अधिकाऱयांनीही कोंबडय़ा चोरीस गेल्याची कबुली दिली. त्यामुळे आता नेमके कोंबडी चोर कोण, याचा शोध गुरूवारच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

 दोन वर्षापूर्वी गाजले होते खैरतोड प्रकरण

दोन वर्षापूर्वी कळबंस्तेतील याच पोल्ट्रीच्या आवारातील शासकीय खैराची पाच मोठी झाडे धोकादायक दाखवून ती सफाईच्या नावाखाली बेकायदेशीररित्या तोडण्यात आली होती. या प्रकरणी झालेल्या चौकशीत पशुसंवर्धनचे डॉ. संतोष निमुणकर दोषी आढळल्याने पंचायत समिती सभेत त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला होता. वनविभागाने खैर जप्त करून 5 हजाराचा दंडही ठोठावला होता. मात्र त्यानंतर कारवाईत प्रशासनाकडून चालढकल करण्यात आली, तर आवाज उठवणारेही पुढे शांत झाले. आता पुन्हा कोंबडय़ा चोरीचे प्रकरण पुढे आल्याने प्रशासन नेमकी काय भुमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

.

Related Stories

दिव्यांग असूनही कोरोना काळात दिव्य काम

NIKHIL_N

बारावीचा निकाल जाहीर

Anuja Kudatarkar

लोटे कंपनीतील स्फोटात तीन कामगार ठार

Patil_p

असनियेत पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात गाभण म्हैस ठार

NIKHIL_N

गणपतीपुळे मंदिरात आज मिळणार ‘श्रीं’चे स्पर्शदर्शन

Patil_p

देवगडातील नऊ ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार ठरणार

NIKHIL_N