Tarun Bharat

कळंबा कारागृहात बिस्कीट पुड्यात मोबाईल

प्रतिनिधी / कोल्हापूर

कळंबा कारागृहामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडणाऱया घटनांच्या पार्श्वभूमीवर कारागृहामध्ये पोलीस व कारागृह प्रशासनाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. बुधवारी कारागृहाची झडती घेत असताना कारागृहामध्ये पुन्हा 1 मोबाईल व 3 बॅटऱया आढळून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल बिस्कीटच्या पुडÎात लपवून ठेवण्यात आला होता. तर 3 बॅटऱया विविध बॅराकमध्ये अत्यंत गोपनीयरित्या ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून कारागृहातील बंद्याचे बॅराक बदलण्यात आले आहेत.

कळंबा कारागृहामध्ये 10 मोबाईल, पेन ड्राईव्ह, चार्जर, व्हीसील कापडÎाच्या गाठोड्या तून फेकल्याची घटना मंगळवार (22 डिसेंबर) च्या मध्यरात्री घडली होती. या घटनेची कारागृहाच्या वरिष्ठ पातळीवरुन विभागीय चौकशी सुरु आहे. सोबतच पोलीस यंत्रणेमार्फत मोबाईल फेकणाऱयांची स्वतंत्र चौकशी सुरु आहे. याची दखल घेवून कारागृह अपर महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी कळंबा कारागृहाचे अधिक्षक शरद शेळके यांची येरवडा येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी येरवडा कारागृहाचे उपअधिक्षक चंद्रमणी इंदुरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच दुसऱया दिवशीच कारागृहाची झडती घेत असताना कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागामध्ये आणखी 1 मोबाईल, 4 बॅटऱया आढळल्याने खळबळ उडाली होती.

या दोनही प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत कळंबा कारागृहामध्ये जुना राजवाडा पोलीस व कळंबा कारागृह  प्रशासनाच्या वतीने संयुक्त सर्च मोहिम सुरु करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, कारागृहाचे उपअधिक्षक चंद्रमणी इंदुरकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झडती मोहिम सुरु करण्यात आली. या दरम्यान बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारा कारागृहातील सर्कल क्रमांक 7 समोर असणाऱया उंबराच्या झाडाच्या बुंद्याजवळ रबर गुंडाळलेला एक बिस्कीट पुडा संशयास्पदरित्या आढळून आला. पोलीस कर्मचाऱयांनी हा बिस्कीट पुडा तपासून पाहिला असता आतमध्ये कागदात गुंडाळलेला एक मोबाईल पोलीसांना आढळून आला. तसेच कारागृहाच्या अन्य तीन बॅराकमध्ये 3 बॅटऱया आढळून आल्या. यानंतर सर्च मोहिम अधिक गतीमान करण्यात आली. दरम्यान याबाबतची फिर्याद कारागृह अधिकारी वर्ग 2 राकेश अभिमन देवरे (वय 35 रा. अधिकारी निवासस्थन, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.

Related Stories

गोकुळच्या निविदा प्रक्रिया पारदर्शी करा

Archana Banage

एसटी संपाला वाढता पाठिंबा

Abhijeet Khandekar

नरंदे गावासाठी चौगुले कुटूंबियातर्फे मोफत रुग्णवाहिका प्रदान

Abhijeet Khandekar

कोल्हापूर महापालिका राबतेय नॉनस्टॉप २४ तास

Archana Banage

कोल्हापूर : ‘सौ चुहे खाके..’ सारखी भाजप प्रदेशाध्यक्षांची स्थिती

Archana Banage

धामणी धरणग्रस्तांची पाण्यासाठी भटकंती; प्रशासनाचे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar