Tarun Bharat

कळे येथील सुरेश सुतार यांनी मॅजिक स्क्वेअर बनवत केला जागतिक विक्रम

Advertisements

प्रतिनिधी / कुरुंदवाड

भारताची अखंडता कायम ठेवण्यासाठी हातात हात घेऊन एकतेची बीजे रोवू असा संदेश देत कळे ता. पन्हाळा येथील सुरेश पांडुरंग सुतार यांनी मॅजिक स्क्वेअर 35 फूट लांबीची सागवान लाकडात विनाजोड साखळी बनवून जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार कोरले आहे.  या साखळीची जागतिकस्तरावर नोंद घेऊन त्यांना अंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल श्री. विश्वकर्मा सुतार लोहार समाज सेवा संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कळे ता. पन्हाळा येथील पंचवीस वर्षीय तरुण सुरेश सुतार यांनी सागवान लाकडात अप्रतिम असे साखळीचे शिल्पकाष्ठ साकारले आहे. कलात्मक दृष्टी असलेल्या ध्येयवेड्या कलाकारने अखंड सागवान लाकडातून 35 फूट विना जोड साखळी तयार केली असून त्याला कोठेही कृत्रिम जोड दिलेला नाही. ही साखळी बनवण्यासाठी त्यांना चार वर्षे लागले आहेत.

     निसर्गाच्या विलक्षण अदाकरीला आपल्या कल्पकतेची जोड देऊन सुरेश सुतार यांनी सागवान लाकडाची विनाजोड बनवलेली साखळी सर्वांना भुरळ पाडणारी आहे. ही साखळी 35 फूट लांबीची 292 कड्यांची व एक किलो चारशे ग्रॅम वजनाची आहे. ही साखळी भारतात प्रथम क्रमांकावर तर गीनेश ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.

या साखळीची जागतिक स्तरावर नोंद झाल्याने सुरेश सुतार यांना आंतरराष्ट्रीय मॅजिक स्क्वेअर पुरस्कार मिळाल्याने त्यांनी कळे, कोल्हापूर जिल्हा व सुतार-लोहार समाजाचे नाव सातासमुद्रपार कोरले आहे. या यशाबद्दल त्यांचा सत्कार श्री विश्वकर्मा लोहार सुतार समाज सेवा संस्थेच्यावतीने सहाय्यक फौजदार आनंदराव सुतार यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष कृष्णात लोहार दानोळीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कोल्हापुरचे नगरसेवक सुरेश सुतार उद्योजक गणेश सुतार या मान्यवरांसह सुतार लोहार समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Related Stories

सोळांकूर येथे वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हातात तलवार घेत दिली धमकी

Sumit Tambekar

काेल्हापूर : यादववाडी मणेरमळा येथे डेंग्यू सद्रुश्य रुग्ण संख्येत वाढ

Abhijeet Shinde

पुलाची शिरोलीत विजेच्या धक्क्याने मजूर जागीच ठार

Abhijeet Shinde

सीपीआर आग चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दर सोमवारी बत्ती गुल…गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या कामाचा खोळंबा

Abhijeet Shinde

भिमगीतातून डॉ. आंबेडकरांना सलाम

Sumit Tambekar
error: Content is protected !!