Tarun Bharat

कशेडीत केवळ खेडवासीयांचेच स्वॅब

Advertisements

प्रतिनिधी/ खेड

मुंबई, पुणे येथून जिल्हय़ात चाकरमान्यांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. या चाकरमान्यांचे कशेडी चेकपोस्टवर तपासणी केल्यानंतर लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात विलगीकरण करण्यात येत आहे. शेकडोंच्या संख्येने येणाऱया चाकरमान्यांमुळे प्रशासनावरील ताण प्रचंड वाढल्याने कशेडी येथे केवळ खेड तालुक्यातील चाकरमान्यांचे स्वॅब घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्य चाकरमान्यांचे त्या-त्या तालुक्यांत स्वॅब नमुने घेतले जाणार आहेत.

आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करत गावी येण्यास मुभा मिळाल्यानंतर गावी जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. मुंबईतील हॉटस्पॉट भागातून येणाऱया चाकरमान्यांची कशेडी येथे तपासणी केली जाते. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱया वाहनांची तपासणी सुरू आहे. या तपासणी मोहिमेमुळे महामार्गावर 10 ते 12 तास वाहने अडकून पडत आहेत. आलेल्या लोकांचा स्वॅब घेणे अन्य सुविधांमुळे प्रशासकीय यंत्रणावरील ताणही वाढला आहे.

कशेडी चेकपोस्टवर रोखण्यात येणाऱया चाकरमान्यांना एस.टी. बसने लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल करून तेथे स्वॅबचे नमुने घेतले जातात. चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येने हा विलगीकरण कक्ष हाऊसफुल्ल झाला आहे. नव्याने येणाऱयांना स्वॅबचे नमुने देण्यासाठी तासन्तास तिष्ठत उभे रहावे लागत आहे. या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी प्रशासनाकडून कशेडी चेकपोस्ट येथेच चाकरमान्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्याच्या हालचाली सुरू होत्या.

त्यानुसार सोमवारपासून कशेडी येथे स्वतंत्र कक्षाची उभारणी करत मुंबई, पुणे येथून खेड तालुक्यात येणाऱया चाकरमान्यांचेच स्वॅब घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अन्य तालुक्यांसह सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चाकरमान्यांची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे त्यांची माहिती घेऊन त्यांच्या त्यांच्या तालुक्यात पाठव्ण्यात येत आहे. कशेडी येथे 6 आरोग्य पथकांसह 30हून अधिक आरोग्य कर्मचारी व 15हून अधिक पोलिसांचा फौजफाटाही याठिकाणी दिवस-रात्र डय़ुटी बजावत आहे.

Related Stories

शाळेच्या घंटेची पूर्वतयारी सुरु

Patil_p

सांस्कृतिक केंद्र दर्शनी भागात पडझड!

Patil_p

होमक्वारंटाईनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा दापोलीत मृत्यू; यंत्रणा सतर्क

Archana Banage

दिवाळी सुट्टी कमी करणाऱया शासन आदेशाची होळी

Patil_p

ट्रक-कार अपघातात मायलेकासह तीन ठार

Patil_p

चाहूल थंडीची ? तळकोकणही हळूहळू गारठतय !

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!