Tarun Bharat

कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार

प्रतिनिधी/खेड :

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर बुधवारी रात्री 10 च्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी कारचे दरवाजे लॉक झाल्याने तीन प्रवाशांना धोका निर्माण झाला होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून अन्य गाडय़ांमधील प्रवाशांच्या मदतीने सर्वजण सुखरूप बाहेर पडले.  या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली होती.

मालेगाव येथील व्यावसायिक इस्माईल शेख शब्बीर हे आपले सहकारी रमझान इब्राहीम शहा व सरोज निजामुद्दीन खान यांच्यासोबत खेर्डी एमआयडीसीमध्ये कामानिमित्त आले होते. आपले काम काम आटोपून आटोपून ते परतीच्या मार्गाला लागले होते. त्यांची वोक्स वॅगन कार कशेडी घाटातील अवघड वळणावर आल्यानंतर काहीतरी जळल्याचा वास आला. धूरही येत असल्याने चालक इस्माईल यांनी कारचा वेग कमी केली. इतक्यात अचानक कारने पेट घेतल्याने त्यांनी कार रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न करत थांबवली.

कारमधून सर्वांनी बाहेर पडायचा प्रयत्न केला मात्र कारचे सर्व दरवाजे लॉक झाल्याने सर्वजण भयभीत झाले. पुढचा धोका ओळखून त्यांनी आरडा-ओरडा करत मदतीचा धावा केला. महामार्गावरून प्रवास करणाऱया अन्य वाहनधारकांनी प्रसंगावधान राखत पेटत्या गाडीतील तिघांनाही मागील दरवाजातून बाहेर काढले. तिघेही कारमधून बाहेर पडताच आगीच्या वेढय़ात कार जळून खाक झाली.

आगीचे वृत्त कळताच तातडीने नगर परिषदेचा अग्निशमक बंबाला पाचारण करण्यात आला. तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दुर्घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. खेड पोलीसांनी या घटनेची अपघाती नेंद केली असून अधिक तपास प्रकाश मोरे करत आहेत.

Related Stories

‘बाप्पा आले’… आज प्रतिष्ठापना!

Patil_p

दापोलीतील अनधिकृत खोके आठ दिवसांत हटवा!

Patil_p

शंभरहून अधिक घरांतील गणपती यंदा मुंबईत

NIKHIL_N

रत्नागिरी तालुक्यात ‘निसर्ग’ ने उडवली दाणादाण

Patil_p

दापोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Archana Banage

वेतन रोखलेल्या शिक्षकांना दिलासा

NIKHIL_N