Tarun Bharat

कसबा बावडयात चोरटयांचा धुमाकूळ; कारच्या काचा फोडून साहित्य केले लंपास

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर (कसबा बावडा) :

कोल्हापूर : कसबा बावडा, अष्टविनायक कॉलनी, नेहरुनगर परिसरात दारात पार्क केलेल्या चार ते पाच चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोरट्यांनी साहित्य लंपास करुन धुमाकूळ घातला. २९ ते ३० जानेवारी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. दोनच दिवसापूर्वी चोरट्यांनी रुईकर कॉलनी परिसरात वाहनांच्या काचा फोडून साहित्य लंपास केले होते. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडत असल्याने रहिवाशांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अनिल बापूसाहेब पाटील (वय ५१ रा. अभिदीप रेसिडन्सी, कसबा बावडा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कसबा बावडा रोडवरील निवारा हाईटस् अपार्टमेंट, अष्टविनायक कॉलनी, नेहरुनगर आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, कावळा नाक्या समोरील महालक्ष्मी हॉलसमोर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. या चोरी रात्री बारा नंतर झाल्या आहेत. चोरट्यांनी काचा फोडून त्यातील स्टेरिओ आणि अन्य साहित्य लंपास केले आहे.

Related Stories

सव्वातीन तासांत 22 किलोमीटरची रंकाळा परिक्रमा

Abhijeet Shinde

पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह विधानामुळे दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : गडहिंग्लजला आगीत 10 लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रक्रिया ठप्प… महा- ई- सेवा गप्प

Abhijeet Shinde

जिवावर बेतणारी नोकरी करत विजेच्या तारांशी संघर्ष सुरचं

Abhijeet Khandekar

बसमध्ये चढताना महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लांबवले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!