Tarun Bharat

कसबा सांगाव गायरान जमीन विनापरवाना बांधकामावर कारवाईची मागणी

Advertisements

कसबा सांगाव / वार्ताहर

कसबा सांगाव ता. कागल येथील गायरान जमीनीत सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरीत थाबवण्याची तसेच या जमीन प्रकरणी चौकशी चालु असताना देखील दिवाळीच्या सुट्टीचा गैरफायदा घेऊन विना बांधकाम परवाना सुरू असलेले बांधकाम थाबवून संबधितावर कारवाईची मागणी उपसरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

या गायरान जमीनमध्ये बेकायदेशीर प्लॉट पाडून प्लॉट वाटप केल्याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, तहसिलदार कागल, गटविकास अधिकारी कागल यांच्याकडे तक्रार दाखल करून दोषीवरीत कारवाईची मागणी केली होती. याबाबत चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही बाबतचे आदेश संबधित विभागानी दिलेले आहेत. निवेदनावर उपसरपंच विक्रमसिंह जाधव, राहुल हेरवाडे, दिपक हेगडे, संतोष मगदुम, सुर्यकांत माळी,रणजितसिंह जाधव यांच्या सहया आहेत. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून या बेकायदेशीर प्लॉट वाटप बाबत उपसरपंच व पाच सदस्यांनी यापूर्वी राजीनामे दिले आहेत.

Related Stories

कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला

Archana Banage

राज्यपालांच्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? संभाजीराजे

Archana Banage

जिल्हय़ात सहावा बळी 28 पॉझिटिव्ह, रूग्णांची संख्या 590 वर

Archana Banage

काय आहे प्लाझ्मा थेरपी ?

Archana Banage

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

Rahul Gadkar

अन्नत्थेने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीला टाकले मागे

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!