Tarun Bharat

कसाल सेंट झेवियर्स चर्च येथे युथ ग्रुप बांधवांतर्फे गरजूंना मदत

Advertisements

वार्ताहर / कसाल:

सेंट झेवियर्स चर्च कसाल येथे युथ ग्रुप बांधवांच्यावतीने 40 निराधार विधवा, अपंग, गरजू व्यक्तींना फुड, किट (फळांचे), खाण्याच्या वस्तू वाटप फादर मेलविन यांच्या हस्ते करण्यात आल्या.

जिल्हय़ात कोविड-19 कोरोना विषाणूचा प्रदूर्भाव वाढू नये सर्व जनता निरोगी राहावी. कोणतीही रोगराई होऊ नये, याबाबत फादर मेलविन यांनी नागरिकांना आरोग्याबाबत आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी आदी विषयावर मार्गदर्शन केले. विविध पक्षाच्या तसेच संस्थांमार्फत पदाधिकारी यांच्यावतीने गरजवंत, विधवा, अपंग यांच्याकरिता विविध प्रकारची आर्थिक मदत केली जात आहे. याच अनुषंगाने कसाल येथील ग्रामस्थांना सेंट झेवियर चर्च ख्रिस्ती बांधवांच्या व युथ ग्रुपच्या माध्यमातून सावंतवाडी येथील फादर मेलविन यांच्या हस्ते 40 जणांना फुड किड्स वाटप करण्यात आले.

यावेळी ईशेद फर्नांडिस, पीटर फर्नांडिस, मिनिन फर्नांडिस, व्हीक्टर फर्नांडिस, आदींच्या उपस्थित हे वाटप करण्यात आले. यावेळी युथ ग्रुपचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Related Stories

शिवराम दळवींकडून ‘सीएम’ निधीसाठी सव्वालाख

NIKHIL_N

‘टीईटी’साठी जिल्हय़ात 2779 उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी

Patil_p

देवगड हापूस पणनच्या ऑनलाईन पोर्टलवर

NIKHIL_N

‘कसाल’चे नामकरण ‘कारलेवाडी’

NIKHIL_N

महामार्गावरील वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी सज्ज!

Patil_p

विनयभंगातील संशयितांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप

Archana Banage
error: Content is protected !!