Tarun Bharat

कसोटीचेही नेतृत्त्व रेहितकडे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत विरूद्ध श्रीलंका या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

श्रीलंकेच्या या दौऱ्यातील टी20 सामने लखनऊ आणि धरमशाला येथे होणार आहेत. तर दोन कसोटी सामने अनुक्रमे मोहाली आणि बेंगळूर येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी रोहित शर्माची वर्णी लागली. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 टीम-
रोहित शर्मा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.

टेस्ट टीम-
रोहित शर्मा (कॅप्टन), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेस), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

Related Stories

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 20 वसतिगृहे सुरू करणार

datta jadhav

मुंबई रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, रहाणेचा समावेश

Patil_p

एल्गार, बवुमा यांची अर्धशतके

Patil_p

रायगड येथील अपघातात कलंबिस्त गावची महिला जागीच ठार

Anuja Kudatarkar

महागाईचा भडका : सलग तिसऱ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

Tousif Mujawar

राफेलच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून उड्डाण

datta jadhav