Tarun Bharat

कसोटी मानांकनात विराट कोहलीची दुसऱया स्थानावर झेप

वृत्तसंस्था/ दुबई

मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या मानांकनात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकनात कोहली यापूर्वी तिसऱया स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. विराट कोहली 886 गुणांसह दुसऱया, चेतेश्वर पुजारा 766 गुणांसह सातव्या तर अजिंक्य रहाणे 726 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने तिसरे, ऑस्ट्रेलियाचा लाबुशेनने चौथे स्थान मिळविले आहे. पाकचा बाबर आझम पाचव्या, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सहाव्या, इंग्लंडचा स्ट्रोक्स 760 गुणांसह सातव्या, इंग्लंडचा रूट 738 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि बुमराह यांचा समावेश आहे. बुमराहने आठवे तर अश्विनने 10 वे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 904 गुणांसह पहिल्या, इंग्लंडचा ब्रॉड दुसऱया आणि न्यूझीलंडचा वॅग्नर तिसऱया स्थानावर आहे. आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या मानांकनात भारताचा रविंद्र जडेजा आणि अश्विन यांनी पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. या मानांकनात इंग्लंडचा स्ट्रोक्स पहिल्या स्थानावर असून रविंद्र जडेजा 397 मानांकन गुणांसह तिसऱया तर अश्विन 281 गुणांसह 6 व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या सांघिक कसोटी मानांकनात भारत सध्या 114 गुणांसह तिसऱया स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 116 गुणांसह पहिल्या, न्यूझीलंड 116 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. इंग्लंडने चौथे, लंकेने पाचवे, दक्षिण आफ्रिकेने सहावे, पाकने सातवे विंडीजने आठवे, बांगलादेशने नववे आणि झिंबाब्वेने 10 वे स्थान मिळविले आहे.

Related Stories

चाहत्यांशिवाय खेळण्यात नेहमीचा थरार नसेल

Patil_p

धडाकेबाज विजयासह इंग्लंडची आगेकूच

Patil_p

मेरी कोम, लवलिनाला पहिला डोस

Patil_p

आयसीसीच्या बैठकीत आज विश्वचषकाचा निर्णय होणार

Patil_p

ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडचा पुन्हा फडशा

Patil_p

विराटकडून मेहदी हसनला खास भेट

Patil_p