Tarun Bharat

कसोटी मालिकेतून नॉर्त्जे बाहेर

Advertisements

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

भारताविरूद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ऍन्रिच नॉर्त्जेला दुखापतीच्या समस्येमुळे मुकावे लागणार आहे. वारंवार दुखापती समस्येमुळे या मालिकेसाठी नॉर्त्जे उपलब्ध होवू शकणार नाही, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.

नॉर्त्जेवर सध्या वैद्यकीय उपचार चालू असून तो या आगामी मालिकेसाठी उपलब्ध होवू शकणार नाही. या मालिकेसाठी नॉर्त्जेच्या जागी दुसऱया बदली खेळाडूचा संघात समावेश केला जाणार नाही, असे सांगण्यात आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी बॉक्सिंग डे पासून प्रारंभ होणार आहे. गेल्या जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेने विंडीजच्या दौऱयात कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत ही तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.

Related Stories

तर लाळेचा वापर करण्यास हरकत नसावी

Patil_p

भारताच्या महिला रिकर्व्ह संघाला कांस्यपदक

Amit Kulkarni

झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर एका धावेने रोमांचक विजय

Amit Kulkarni

भारताची विंडीजवर मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात मॅकडरमॉटचा समावेश

Patil_p

उपांत्य फेरीत गाठत नादिया पोडोरोस्काचा विक्रम,

Patil_p
error: Content is protected !!