Tarun Bharat

कस्टर्ड केक

साहित्य : 1 वाटी मैदा, अर्धी वाटी व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर अथवा कॉर्नफ्लोर, 1 चमचा बेकिंग पावडर, पाऊण वाटी साखर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस, 2 चमचे बटर, 1 वाटी दूध

कृती : चाळणीमध्ये कस्टर्ड पावडर, मैदा आणि बेकिंग पावडर घालून चाळून घ्यावे. साखर मिक्सरला लावून पावडर बनवून घ्यावी. बाऊलमध्ये दूध घेऊन त्यात बटर मिक्स करावे. आता त्यात व्हॅनिला इसेंस मिक्स करावे. नंतर मिक्सरला लावलेली साखर टाकून विरघळेपर्यंत फेटावे. आता यामध्ये चाळलेला मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकिंग पावडर टाकून मिश्रण क्रीमी होईपर्यंत मिक्स करावे. बेकिंग पॅनवर बटर टाकून पसरवून घ्यावे. त्यावर तयार कस्टर्ड केकचे मिश्रण ओतून एकसारखे करावे. ओव्हन 180 डीग्रीवर 10 मिनिटे प्रिहीट करावे. बेकिंग पॅन ओव्हनमध्ये 35 ते 40 मिनिटे ठेवून केक बेक करावा. आता केक पूर्णतः गार झाला की त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून खाण्यास द्या.

Related Stories

ट्राय करा स्वादिष्ट आणि चमचमीत मुळ्याचा पराठा

Kalyani Amanagi

खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत

Kalyani Amanagi

हरभरा चाट

Omkar B

पनीर रोल

Omkar B

‘हापूस’ समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना..!

Rohit Salunke

पटकन होणारे उपवासाचे पॅटिस

Kalyani Amanagi