Tarun Bharat

काँग्रेसकडून उद्या म्हापशात ‘महागाईचा नरकासुर वध’ आंदोलन

पणजील पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम् यांनी सरकारवर केला हल्लाबोल

प्रतिनिधी /पणजी

केंद्रातील मोदी सरकारने गोव्यासह देशातील जनतेला महागाई व दरवाढीची दिवाळी ‘भेट’ दिली असून त्याचा निषेध म्हणून म्हापसा येथे बुधवार दि. 3 नोव्हेंबर रोजी गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे महागाईचा नरकासुराचा वध आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल – डिझेलने प्रति लिटर रुपयांची शंभरी केव्हाच पार केली असून त्याची कोणतीच कारणे मोदी सरकार देत नाही आणि त्यावर काहीच बोलत नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडर तर एकाच धपक्यात रु. 266 ने वाढवल्यामुळे हॉटेल – रेस्टॉरंटमधील खाणे महाग होणार असल्याचे सांगून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांनी मोदी – सावंत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, काही राज्यात तर पेट्रोलचे दर प्रतिलिटर रु. 115 ते 120 पर्यंत पोहोचले आहेत. क्रिकेटमध्ये भारताचे खेळाडू शंभरी (सेंच्युरी) पार करीत नाहीत परंतु मोदींनी मात्र पेट्रोल – डिझेलची शंभरी गाठून पुढील आगेकूच सुरु ठेवल्याचा टोमणा चिदंबरम् यांनी मारला.

राज्यपालांनी सरकारला उघडे पाडले

इंधन दरवाढीप्रकरणी काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजपासोबत वाद-विवाद करायला तयार आहे. या दरवाढीची कारणे सरकारने सांगावीत. विविध प्रकारचे कर लावण्यात आल्यामुळे हे पेट्रोल – डिझेलचे दर मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचा दावा चिदंबरम् यांनी केला. राज्यपालांनी गोवा सरकार आणि डॉ. प्रमोद सावंत यांचा भांडाफोड केला असून त्यावर सरकारने एक शब्द काढलेला नाही तसेच केंद्रानेही राज्यपालांवर कोणतीच कारवाई केलेली नाही. यावरुन राज्यपालांनी सरकारला उघडे पाडल्याची टीका चिदंबरम् यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोमंतकीय जनतेने चांगला प्रतिसाद दिला व काँग्रेस कार्यकर्ते – पदाधिकारी यांनी त्यांची गोवा भेट यशस्वी केली म्हणून चिदंबरम् यांनी सर्वांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले.

Related Stories

हस्तांदोलनावेळी लस घेतल्याची विचारपूस करा

Amit Kulkarni

योग जागृतीमुळे अनेक देशांची कोरोनावर मात

Amit Kulkarni

राजकीय पक्षांनी विशेष अधिकारी नेमावा

Amit Kulkarni

गटारे, नाल्यांच्या सफाईसाठी माजी नगरसेवकांचा पुढाकार

Omkar B

म्हादईवरील कर्नाटकच्या बांधकामांना स्थगिती द्यावी

Amit Kulkarni

मशीनमध्ये हात अडकून कामागार जखमी

Patil_p