Tarun Bharat

काँग्रेसकडून जारकिहोळी यांना अटक करण्याची मागणी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

प्रदेश कॉंग्रेसने भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व्ही.एस. उग्रप्पा म्हणाले यांनी काँग्रेसला विशेष तपास पथकाकडून न्यायाची अपेक्षा नाही, असे म्हंटले आहे. तसेच जारकिहोळी यांना अटक होत नाही तोपर्यंत काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचे म्हंटले आहे.

तसेच या संदर्भात एफआयआर नोंदवण्यापूर्वी एसआयटी करण्याच्या राज्य सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसआयटी राज्य सरकारच्या कठपुतळीसारखे काम करत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी रमेश जारकिहोळी यांना अटक करण्याच्या बदल्यात एसआयटी मुलीच्या पालकांची चौकशी करीत आहे.

दरम्यन एसआयटी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर जराकिहोळी यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट झाले आहे. प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सलीम अहमद यांनी, एसआयटीच्या तपासावर कॉंग्रेसला विश्वास नसल्याचे म्हंटले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी केपीसीसीची मागणी आहे.दरम्यान रमेश जारकिहोळी यांना अटक होईपर्यंत आणि या प्रकरणात नोंद होईपर्यंत कॉंग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे.

Related Stories

आपण कोणाविरुद्धही तक्रार केलेली नाही : ईश्वरप्पा

Amit Kulkarni

प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणार

Omkar B

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय चर्चेनंतर : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

बारावीचा निकाल ग्रेड नव्हे; तर गुणांच्या स्वरुपात

Amit Kulkarni

मंत्र आत्मनिर्भरतेचा, अर्थसंकल्प राज्याचा

Amit Kulkarni

दिलासादायक: कर्नाटकात कोरोना सकारात्मकता दर २.५९ टक्क्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!