Tarun Bharat

काँग्रेसकडून सतीश जारकीहोळींना तिकीट

हायकमांडकडून शिक्कामोर्तब – निजदची भूमिका अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी राज्य काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत सतीश जारकीहोळी यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडेकरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सहा दिवसांनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, हायकमांडने याबाबत शुक्रवारी अधिकृतपणे घोषणा केली आहे. एआयसीसीचे मुख्य सचिव मुकुल वास्निक यांनी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

गुरुवारी रात्री भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस हायकमांडकडून उमेदवार घोषित करण्यात आला आहे. निजदने पेवळ बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार दिला आहे. दरम्यान, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीबाबत निजदची भूमिका अद्याप समजलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च शेवटची तारीख आहे. तर 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण आणि रायचूर जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने मागील आठवडय़ात उमेदवारांची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे पोटनिवडणूक घोषणा न झालेल्या विजापूर जिल्हय़ातील सिंदगी मतदारसंघासाठी देखील उमेदवार जाहीर केला होता.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य शासनाकडून ‘या’ दोन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी

Archana Banage

पूरस्थिती : केंद्राकडे अधिक मदतनिधी मागणार

Patil_p

काशी-त्रिवेणी संगम यात्रेची सांगता

Amit Kulkarni

आधारकार्डसाठी अधिक रक्कम घेणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेला अलोट गर्दी

Omkar B

शहापूर येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Amit Kulkarni