Tarun Bharat

काँग्रेसची स्टार प्रचारक यादी घोषित, सिद्धू-शत्रुघ्न करणार प्रचार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी बुधवारी घोषित करण्यात आली.

या यादीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आहेत. यासोबतच नवजोतसिंग सिद्धू यांच्यासोबत भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनाही काँग्रेसचे स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील पक्षासाठी मत मागणार आहेत.

शत्रुघ्न सिन्हा, उदित राज यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. कपिल सिब्बल यांच्यासह हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंग हुड्डा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत नाव आहे.

 

Related Stories

दुखापतीमुळे आर्चर दोन महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर

Patil_p

पंजाब : तीन मजली इमारत कोसळली, सहा ते सात जण अडकल्याची भिती

prashant_c

‘त्या’ व्हिडिओवरून राहुल गांधींना फेसबुकची नोटीस

Archana Banage

‘महापारेषण’च्या अध्यक्षांना ‘ग्रीनटेक’चा पुरस्कार

Amit Kulkarni

सिसोदियांची दिवसभर सीबीआयकडून चौकशी

Amit Kulkarni

हैद्राबादमध्ये हिंदू विद्यार्थ्यावर अत्याचार

Patil_p
error: Content is protected !!