Tarun Bharat

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी पवनकुमार बन्सल

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

यापूर्वी दिवंगत नेते आणि माजी खासदार अहमद पटेल यांनी पक्षाचे कोषाध्यक्षपद सांभाळले होते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी हंगामी उपाय म्हणून बन्सल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. 72 वर्षीय पवनकुमार हे 10, 13, 14 आणि 15 व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

मनमोहन सिंग सरकारमध्ये बन्सल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि जलसंपदा मंत्रालयाचेही काम त्यांनी पाहिले आहे. ते केंद्रीय रेल्वेमंत्रीही होते, मात्र, त्यांचे पुतणे विवेक सिंगला यांच्यावर लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर त्यांना 3 मे 2013 रोजी या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

Related Stories

मोदींनी लाँच केल्या RBI च्या दोन नव्या योजना

datta jadhav

मध्यप्रदेशात विषारी दारूचे 20 बळी

Patil_p

मध्यप्रदेश मंत्रिमंडळ विस्तार; सिंधियांच्या ‘या’ समर्थकांना मिळणार संधी

datta jadhav

भारतात मागील 24 तासात 26,506 नवे कोरोना रुग्ण, 475 मृत्यू

datta jadhav

नवज्योत सिंह सिद्धू उद्या घेणार राहुल गांधी यांची भेट

Rohan_P

मध्यप्रदेश : वीज बीलाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!