Tarun Bharat

काँग्रेसच्या संसदीय समितीमध्ये बाजीराव खाडेंची निवड

Advertisements

सांगरुळ / प्रतिनिधी

अखिल भारतीय काँगेस कमिटीचे सचिव बाजीराव खाडे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या संसदीय समितीमध्ये निवड झाली आहे. संसदीय मंडळावर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हे पदसिद्ध असतात. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सचिन नाईक ,संजय दत्त, पृथ्वीराज साठे यांचा समावेश आहे.

बाजीराव खाडे सांगरुळ (ता. करवीर) गावचे रहिवाशी असून त्यांनी कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना परिसरात कुंभी कासारी बचाव मंचच्या माध्यमातून शेतकऱ्यांची विविध आंदोलने केली आहेत. पंचायत राज अभियानच्या माध्यमातून गावोगावी पदयात्रा काढून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाजीराव खाडे यांनी केला आहे .

Related Stories

कोल्हापूर : तीन हजाराची लाच स्विकारताना कॉन्स्टेबलसह होमगार्ड जेरबंद

Archana Banage

राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 31922 क्युसेक विसर्ग,102 बंधारे पाण्याखाली

Archana Banage

पुलाची शिरोली येथे वाहन चोरी प्रकरणी एकास अटक

Archana Banage

कोल्हापूर उत्तर : बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस – चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : पंचगंगा पात्राबाहेर; ५५ बंधारे पाण्याखाली

Archana Banage

कोल्हापुरातून रात्री उशिराच्या रेल्वेगाड्य़ा सुरू करणार

Archana Banage
error: Content is protected !!