Tarun Bharat

काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा; थोरात म्हणाले…

बेंगळूर/प्रतिनिधी

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. यांनतर राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेनंतर बाळासाहेब थोरात यांनी फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय.

एखाद्या दुर्दैवी घटनेमुळं जागा रिक्त होते तेव्हा महाराष्ट्राची परंपरा आहे की ती निवडणूक बिनविरोध करायची. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगितल्याचं थोरात म्हणाले. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही, असंही थोरात म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातलं अशी चर्चा सुरु असल्याचं पत्रकार म्हणाले. त्यावेळी लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती होती. ही परंपराच आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्ह्णून आम्ही फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे, असं थोरात म्हणाले.

काँग्रेस नेत्यांनी का घेतली होती फडणवीसांची भेट..येथे क्लिक करत वाचा सविस्तर बातमी

Related Stories

देशातील लॉकडाऊन वाढवण्याची आयसीएमआरची केंद्राकडे शिफारस

datta jadhav

व्यंकय्या नायडूंच्या ‘ट्विटर’ अकाउंटला पुन्हा ब्लू टिक

datta jadhav

आमदार शिवेंद्रराजेंसह समर्थकांना जामीन मंजूर

Patil_p

उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट ; म्हणाले…

Archana Banage

घरकुल योजनेतील अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात

Patil_p

धनंजय मुंडेंनी ताईसाहेब..म्हणताच पंकजा मुंडे म्हणतात, हक्क तुम्हाला आहेच भाऊ !

Archana Banage