Tarun Bharat

काँग्रेसने केले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

Advertisements

मोदी हटाव देश बचावचा खुर्चीवर बसून दिला नारा

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या काळात भरमसाठ पेट्रोल डिझेलच्या किमंती वाढवण्यात येत आहेत. केंद्र सरकारने इंधन दरवाढ करुन जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरु आहे. त्याच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्यासमोर आंदोलन करण्यात आले. मोदी हटाव देश बचाव अशा घोषणा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार चढाओढ सुरु होती.

या आंदोलनात मंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, मलकापूर नगरपालिकेचे मनोहर शिंदे, ऍड.दत्तात्रय धनावडे, नरेश देसाई, बाळासाहेब शिरसाट, धैर्यशील सुपले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी हातात पाटय़ा धरल्या होत्या. इंधन दरवाढ कमी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले. निवेदनात केंद्र शासन पुरेपुर अपयशी ठरलेले आहे. देशातील जनता संकटात सापडलेली असताना पेट्रोल, डिझेल दरवाढ करुन आणखी कर वाढवत आहे. हे कुठे तरी थांबवले पाहिजे, लोकांच्या खिशाला परवडेल अशी भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Related Stories

‘जकातवाडीचा अध्यादेशात नाव घ्यायलाच लावणार’

Patil_p

चक्क रिक्षातच लावला महिलेला ऑक्सिजन

Patil_p

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

Rohan_P

नंदगाव येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सातार्यात घर मालकानेच केला भाडेकरू विवाहितेवर बलात्कार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात ८ बळी, दिवसभरात १६७ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!