Tarun Bharat

‘काँग्रेसमुक्त भारत’ हे ममता-भाजपचे स्वप्न

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसमुक्त भारत’ हे ममता बॅनर्जी आणि भाजपचे स्वप्न आहे, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘स्वस्तिका’ या बंगाली मासिकात करण्यात आला आहे. 13 डिसेंबर रोजी हा लेख या मासिकात प्रकाशित झाला असून, तो निर्मल मुखोपाध्याय यांनी लिहिला आहे.

‘केनो इतिहास मुचे चेन ममथा? शिल्पो ऍग्रोहो ना सोनिया खोटम?’ असे या लेखाचे शिर्षक आहे. ममता इतिहास का पुसत आहेत? गुंतवणूकदारांना आमिष दाखवायचे की सोनियांचा नाश करायचा? असा प्रश्न या लेखात विचारण्यात आला आहे. दरम्यान, या लेखापासून भारतीय जनता पक्षाने स्वत:ला दूर ठेवले असल्याचे म्हटले आहे. तर तृणमूल काँग्रेसने भाजपशी कोणताही करार निराधार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांचा चेहरा आता चव्हाटय़ावर आला आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेसने दिली आहे.

या लेखात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे. काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नावर दोघांनी चर्चा केली, असा दावा करण्यात आला आहे. या मासिकाचे संपादक टिळक रंजन बेरा यांनी या लेखावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Stories

आता ऑफिसमध्येही लसीकरण

Patil_p

आंध्र प्रदेश : विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये कोसळली क्रेन; 11 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

Patil_p

मांडवली करायची असती तर १०० दिवस तुरुंगात राहिला नसता – उद्धव ठाकरे

Archana Banage

आनंदसरी महाराष्ट्रात…

Patil_p

हॅलेप-बिट्रेझ माया अंतिम लढत

Patil_p