गुडुर नारायण रेड्डी यांचा राजीनामा
हैदराबाद
तेलंगणात काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आणि तेलंगणा काँग्रेसचे खजिनदार गुडुर नारायण रेड्डी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यासंबंधी रेड्डी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. रेड्डी सुमारे 4 दशकांपर्यंत काँगेसमध्ये कार्यरत होते. काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जाणारे रेड्डी भाजपमध्ये सामील होणार आहेत. 1981 मध्ये विद्यार्थीदशेपासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे. तेलंगणा काँग्रेसचे खजिनदारपद, एआयसीसीचे सदस्यत्व आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे रेड्डी यांनी पत्रात नमूद पेले आहे. काँग्रेस पक्ष हैदराबाद महापालिका निवडणुकीत केवळ 2 जागा जिंकू शकला होता. तर या निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेत दुसरे स्थान प्राप्त केले होते.