Tarun Bharat

“काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू ”

Advertisements

ऑनलाईन टीम / पणजी

गोवा तृणमूल भाजपच्या फुटीरतावादी शक्तींच्या हल्ल्यात भारतातील धर्मनिरपेक्ष फॅब्रिक आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी येथे आहे याचा पुनरुच्चार करून, राज्यसभा खासदार आणि ‘AITC’ गोवा सह-प्रभारी सुष्मिता देव, गोवा ‘टीएमसी’ उपाध्यक्ष डॉ जोर्सन फर्नांडिस आणि वालंका आलेमाव यांनी मडगावमधील प्रसारमाध्यमांना संबोधित करताना इतर पक्षांच्या खोट्या प्रचाराचे खंडन केले. पत्रकारांना संबोधित करताना डॉ जोर्सन फर्नांडिस म्हणाले, “आम्ही गोव्यातील फुटीरतावादी शक्तींविरोधात काम करत आहोत.

‘टीएमसी’विरोधात खोटा प्रचार केला जात आहे आणि मला असे म्हणायचे आहे की काँग्रेसला दिलेले प्रत्येक मत हे भाजपला मिळालेले मत आहे. 2017 मध्ये तेव्हा कॉंग्रेसने लोकांच्या जनादेशाचा आदर केला गेला नाही , आणि ते सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” नावेली ‘टीएमसी’च्या उमेदवार वालंका आलेमाव यांनी सांगितले की, “आमच्या पक्षावर खोट्या प्रचाराद्वारे हल्ला करण्यात आला ,कारण आम्हाला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. इतर पक्ष लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने गोमंतकीयांना वेळोवेळी मूर्ख बनवले आहे.”

‘टीएमसी ‘म्हणजे मंदिर, मशीद, चर्च असे ठासून सांगत वालंका पुढे म्हणाल्या की, गोव्यातील जनतेने फुटीरतावादी शक्तींविरुद्ध एकजुटीने लढले पाहिजे. “काँग्रेसने लोकांना पुन्हा फसवू नये. प्रत्येक मत गोव्याचे भविष्य ठरवते आणि मी जनतेला एकजुटीने लढण्याचे आवाहन करते.
काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाला न फुटण्याची प्रतिज्ञा केल्याबद्दल खोचकपणे, सुष्मिता देव म्हणाल्या, “काँग्रेस सदस्यांच्या प्रतिज्ञांची समाप्ती तारीख 10 मार्च आहे. पुन्हा एकदा 2017 ची पुनरावृत्ती होईल, जिथे काँग्रेस सदस्य भाजपमध्ये प्रवेश करतील. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ ,कारण ‘टीएमसी’ हा एकमेव पक्ष आहे जो त्यांच्या ताकदीचा सामना करू शकतो. आम्ही गोव्यातील लोकांना आवाहन करतो की, गोव्यात नवी सकाळ सुरू करावी.

Related Stories

ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन अखेर समाप्त

Omkar B

आर्थुर डिसिल्वा यांच्याकडून मडगावातून लढण्याची तयारी

Amit Kulkarni

स्ट्रॉबेरीनंतर सत्तरीत चेरीची लागवड यशस्वी

Amit Kulkarni

मार्केटमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

tarunbharat

‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स’चे मडगावात उद्घाटन

Patil_p

ऍड. रायकर यांना विधी विशारद पुरस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!