Tarun Bharat

काँग्रेस कमिटीच्या इमारतीला 62 वर्षानंतर नवी झळाळी

प्रतिनिधी/ सातारा

देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. जिह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वांत जुना पक्ष आहे. याच पक्षाच्या इमारतीला तब्बल 62 वर्ष पूर्ण झाल्याची नोंद तेथे असलेल्या उद्घाटन फलकावरुन स्पष्ट होत आहे. 62 वर्षांनतर जिल्हा काँग्रेस कमिटीची इमारतीला नवी झळाळी मिळाली असून यामध्ये मोलाचा वाटा हा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा संपर्कमंत्री सतेज पाटील यांचा आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी लोकवर्गणीतून काँग्रेस कमिटीचा कायापालट केलेला आहे. येत्या पंधरा दिवसात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.

साताऱयातल्या काँग्रेस कमिटीला आगळा वेगळा इतिहास आहे. या इमारतीने अनेक नेते घडवले आणि राज्याच्या देशाच्या राजकारणात चमकले. इमारतीच्या कोनशिलेचा इमारतीचा शुभारंभ दसऱयाला दि. 11 ऑक्टोबर 1959 ला तात्कालिन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांच्या हस्ते  समारंभ पार पडला. त्यानंतर तात्कालिन गृहमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 19 जानेवारी 1967 ला उद्घाटन झाले. या इमारतीने अनेक राजकीय नेते घडवले. अगदी राज्याचे आणि देशाच्या राजकारणाची सुत्रे काहीकाळ याच काँग्रेस कमिटीतून हलली गेली. जेव्हा जिह्याच्या दौऱयावर इंदिरा गांधी आल्या होत्या त्यावेळीही काँग्रेस कमिटीमध्ये जनसागर त्याकाळी जमलेला सातारा जिल्हावासियांनी पाहिला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीही याच जिल्हा काँग्रेस कमिटीतून राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवल्याचे आज जिह्यातील काही जुनी मंडळी आर्वजून सांगतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर याच काँग्रेस कमिटीत मोजक्याच मंडळींची उठबस सुरु झाली. इमारतीची तिच अवस्था झाली होती. पावसाळय़ात छतातून पाणी गळत असायचे. तेथे काँग्रेस कमिटीची सेवा करणारे इंगवले यांनी तर बादल्या लावून पाणी साठवले. काँग्रेसचे तात्कालिन जिल्हाध्यक्ष मदन भोसले असतील, आनंदराव पाटील असतील यांच्या कार्यकाळात नुतनीकरणाचा प्रयत्न झाला होता. तात्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात काँग्रेसचे त्यावेळचे शहराध्यक्ष रवींद्र झुटींग यांनी प्रयत्न करुन रंगरंगोटी केली होती. तब्बल 62 वर्षानंतर र्कॉग्रेस भवन हायफाय होत आहे. काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱयांनी नुतनीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी त्या अनुषंगाने पाठपुरावा केला. बघता बघता प्रत्येकांने स्वइच्छेने मदत केली अन् कार्य सुरु झाले. काँग्रेस कमिटीची इमारतीला नवे रुप आले आहे. मोलाचा वाटा प्रामुख्याने राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा आहे. 

15 दिवसांमध्ये उद्घाटन घेतो आहे

सगळयांच्या प्रयत्नाने काँग्रेस कमिटीचे काम झाले आहे. काँग्रेस कमिटीच्या नुतनीकरणाचे पंधरा दिवसात लोकार्पण आम्ही करतो आहोत. अत्याधुनिक पद्धतीने काँग्रेस कमिटीतून कामकाज चालणार आहे. तशी सोय करण्यात आलेली आहे.

जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव

Related Stories

बैलगाडी शर्यती प्रकरणी सहाजणांवर गुन्हा

Amit Kulkarni

चार मंत्र्यांच्या दौयामुळे तारळी योजनेस चालना : डॉ. येळगावकर

Patil_p

सातारा जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.२५ मि.मी.पावसाची नोंद

Archana Banage

कडेगावात आज फुटणार ऊसदराची कोंडी

Archana Banage

वेळेपूर्वी दुकाने उघडी ठेवणाऱया चौघांवर गुन्हा

Patil_p

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर फिरतात वाघ

datta jadhav