Tarun Bharat

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला स्पष्ट बहुमत मिळणार

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

प्रतिनिधी /पणजी

काँग्रेस पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे निवेदन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले असून काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम व प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी उत्तर गोव्यातील सर्व 19 मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांना मार्गदर्शन केले. मतमोजणीच्यावेळी सर्वांनी लक्ष देऊन काम करावे, अशी सूचना उमेदवारांना करण्यात आली.

काँग्रेसच्या पाटो पणजी येथील निवडणूक प्रचार कार्यालयात उत्तर गोव्यातील उमेदवारांची बैठक घेण्यात आली. त्यांच्याकडून मतदारसंघातील एकंदरीत मतदानाचा आढावा घेऊन काँग्रेस काँग्रेस पक्षाला बहुमत मिळणार अशी खात्री वर्तवण्यात आली. मतमोजणीच्यावेळी उमेदवारांसह पक्ष प्रतिनिधी निवडणूक एजंट यांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन सर्वांना करण्यात आले.

मतदारांनी बदलासाठी मतदान केले

मतमोजणी कुठे होणार व कशा पद्धतीने होणार आणि त्यासाठी कशी सज्जता करावी याबाबत उमेदवारांना संपूर्ण तपशीलासह माहिती देण्यात आली. सर्व उमेदवारांनी काँग्रेस पक्ष व आपण स्वतः विजयी होणार असल्याची खात्री दिली. मतदारांनी बदलासाठी मतदान केले असून ते काँग्रेस पक्षाकरीता झाल्याचा दावा बहुतेक काँग्रेस उमेदवारांनी केला.

बैठकीला कामत तसेच गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मतमोजणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे या बैठकीत एकंदरीत तयारी करण्यात आली आणि पुढील रणनितीवर चर्चा झाली.

भाजपविरोधात जनतेमध्ये असंतोष

भाजप सरकारच्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून जनतेमध्ये असंतोष धुमसत असून त्याचा रागा लोकांनी मतदानातून प्रकट केला असून एकंदरीत जनमत कौल काँग्रेसच्या बाजूने असल्याची माहिती कामत यांनी दिली. भाजप सरकारला जनता कंटाळली असून ती आता काँग्रेसलाच संधी देणार असल्याचा विश्वास कामत यांनी प्रकट केला.

Related Stories

अ. भा. मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत संध्या, सी. के. अयुब, लिना पेडणेकर यांची चमक

Amit Kulkarni

ओडिशाने दिला मुंबई सिटीला पराभवाचा जबरदस्त शॉक

Amit Kulkarni

‘पोस्टल बॅलेट’साठी पक्षांमध्ये चढाओढ

Amit Kulkarni

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची संपत्ती जप्त करा

Patil_p

कर्नाटकमुळे म्हादईचा अहवाल रेंगाळला

Patil_p

तिस्क उसगांव येथे बेशिस्त पार्किंगवर तोडगा काढणार

Amit Kulkarni