Tarun Bharat

काँग्रेस गोव्यात येत्या १० ते १५ महिन्यांत सरकार स्थापन करेल : आमदार मायकल लोबो

Advertisements

ओंलीनेटीम/तरुण भारत

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय संपादन करत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलीय. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दुसऱ्यांदा नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. गोव्यात काँग्रेस सत्तेत येईल अशी अशा काँग्रेस नेत्यांना होती. परंतु काँग्रेसचा अपेक्षाभंग झाला आणि भाजप पुन्हा सत्तेत आली. अशावेळी काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (MLA Michael Lobo) यांनी मोठा दावा केलाय.

लोबो यांनी गोव्याच्या राजकारणात काहीही असंभव नाही असा दावा केलाय. तसेच गोव्यातील वास्तव पाहता गोव्यात अचानक बदल होऊ शकतो. आम्ही येणाऱ्या काही महिन्यात सरकार बनवू आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. एक-दीड वर्षात आम्ही सरकार बनवण्यात सक्षम होवू, असा दावाही लोबो यांनी केलाय.

आमचा पक्ष सत्तेत येईल
दरम्यान, लोबो यांनी गोव्याच्या राजकारणात काहीही असंभव नाही. गोव्यातील वास्तव पाहता गोव्यात अचानक बदल होऊ शकतो. आम्ही येणाऱ्या काही महिन्यात सरकार बनवू आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. एक-दीड वर्षात आम्ही सरकार बनवण्यात सक्षम होवू’, असा दावाही लोबो यांनी केलाय. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार लोबो यांना विचारण्यात आलं की, भाजपकडे 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी संख्याबळ कसं गोळा कराल? त्यावर पुढील वर्ष महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष लवकरच गती पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल, असा दावा लोबो यांनी केलाय.

Related Stories

आमच्या उत्पन्नाच्या जागेत आयआयटी नको

Patil_p

देशात डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर; ४ महिन्यांच्या उच्चांकावर

Sumit Tambekar

Ashadhi Wari : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह पंढरपूरकडे रवाना

Abhijeet Shinde

पोर्तुगालमध्ये भारतीय महिलेचा मृत्यू; आरोग्यमंत्री मार्टा टेमिडोंनी नैतिक जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा

Abhijeet Shinde

कर्नाटकात संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी १.५ कोटी मुलांची होणार कोरोना चाचणी

Abhijeet Shinde

पेगासस संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी

datta jadhav
error: Content is protected !!