Tarun Bharat

काँग्रेस, टीएमसीच्या ’त्या’ उमेदवारांना अपात्र ठरवा

आपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

प्रतिनिधी /पणजी

निवडणुकीनंतर पक्ष बदलण्यासाठी कोटय़वधींची लाच मागणाऱया तसेच आगाऊ पैसे स्वीकारणाऱया काँग्रेस व टीएमसीच्या उमेदवारांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्यावर आरपी कायद्यांतर्गत खटला चालवावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसचे संकल्प आमोणकर, सावियो डिसिल्वा, आवेर्तान फुर्तादो आणि टीएमसीचे चर्चिल आलेमाव हे चार उमेदवार निवडणुकीनंतर पक्ष बदलण्यासाठी कोटय़वधींची मागणी करत असल्याबाबत एक स्टिंग व्हीडिओ एका वृत्त वाहिनेने प्रसारित केला होता. त्या अनुषंगाने आपने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

’हिंदी खबर’ या वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची धक्कादायक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत काँग्रेसचे संकल्प आमोणकर, सावियो डिसिल्वा, आवेर्तान फुर्तादो आणि टीएमसीचे चर्चिल आलेमाव हे चौघे उमेदवार निवडणुकी नंतर कशाप्रकारे भाजपमध्ये प्रवेश करतील यावर कथित चर्चा करताना दिसत आहेत. अशा प्रकारांमुळे गोव्यात राजकीय नैतिकता कशी लयास गेली आहे त्याचे हे भयानक उदाहरण आहे. निवडणूक होण्यापूर्वीच ते जनतेचा विश्वासघात करण्याच्या तयारीत आहेत, हा त्याचा पुरावा आहे, असे आपने म्हटले आहे.

Related Stories

‘झुआरी ऍग्रो’ जमिनीचा ‘झोन’ का बदलला?

Amit Kulkarni

श्रावणमासानिमित होंडा आजोबा कळसापेड देवस्थानात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Amit Kulkarni

काँग्रेसकडून उद्या म्हापशात ‘महागाईचा नरकासुर वध’ आंदोलन

Amit Kulkarni

मुरगाव हिंदू समाजाच्या घुमट आरती स्पर्धेत श्री राष्ट्रोळी दामोदर आरती मंडळ प्रथम

Amit Kulkarni

बार्देश तालुक्यातून तिसऱया दिवशी 29 अर्ज दाखल

Omkar B

युवा काँग्रेसतर्फे बिल्डकाँम कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

Patil_p