Tarun Bharat

एच. के. पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्व देतो; प्रफुल्ल पटेलांचा पटोलेंना टोला

मुंबई/प्रतिनिधी

राज्यात काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. नाना पाटोले वारंवार स्वबळाची भाषा करत असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसापासून धुसफूस सुरु आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया वक्त करताना नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना टोले लगावले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असं पटेल यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी नानांना टोला लगावला आहे.

दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाना पटोलेंना टोले लगावले. माध्यमांनी काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे, असे विचारले असता पटेल यांनी नानांना टोले लगावले. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलं नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचं त्यांनी ते करावं. त्यावर आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?, असा सवाल पटेल यांनी केला.

Related Stories

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाबत कोर्ट निरीक्षणं नोंदवणार

Abhijeet Khandekar

महापूर ओसरतोय, महामार्ग सुरू

Archana Banage

”कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल”

Archana Banage

‘सीआरपीएफ’ मधून बडतर्फ केलेल्या महिलेची जवानासोबत हुज्जत ; प्रवेशद्वारावर दगदफेक

Archana Banage

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Patil_p

कणकवलीत चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले

Anuja Kudatarkar