Tarun Bharat

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात जोडे- मारो आंदोलन

भाजपसह युवा मोर्चा, महिला मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

प्रतिनिधी / कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी जीवनावर आक्षेपाहार्य विधान करून त्या पदाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला सोमवारी भाजप, भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोड-मारो आंदोलन करत निषेध नोंदवला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष विजयसिंह खाडे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पटोले यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. महिला आघाडीच्या वतीने बिंदू चौकात जोडे -मार आंदोलन करून पटोलेंचा निषेध करण्यात आला.

पटोले यांचा निषेध करताना माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील म्हणाले, राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकावर राहिला व काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने वैफल्य ग्रस्त झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदींविषयी आक्षेपार्ह विधान करत करून खोटी प्रसिद्धी आणि काँग्रेस हायकमांडची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जर नाना पटोले कोल्हापुरात आले तर भारतीय जनता युवा मोर्चाकडून त्यांचे कोल्हापुरी चप्पलानेच स्वागत करण्यात येईल.

भाजपचे सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, जगामध्ये लोकप्रिय असणाऱया पंतप्रधान मोदींविषयी अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलून स्वतःचे महत्व वाढवण्याऐवजी पटोले यांनी स्वतःचे कर्तृत्व काय ? याचा शोध घ्यावा. युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस विवेक वोरा यांनी जोपर्यंत नाना पटोले यांना पोलीस अटक करत नाहीत आणि काँग्रेस त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत नाहीत तो पर्यंत युवा मोर्चाची उग्र आंदोलने सुरूच राहतील, असा असा इशारा दिला. यावेळी भाजपचे सरचिटणीस विजय जाधव व पक्षातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

धनंजय मुंडेंनी तत्काळ राजीनामा द्यावा

Archana Banage

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या किंमती कमी करा : खासदार धैर्यशील माने

Archana Banage

सिंधुताईंचा कोल्हापूरशी साडेतीन दशकाचा स्नेह ! : माजी महापौर भिकशेठ पाटील यांनी केले होते सहाय्य

Abhijeet Khandekar

गोकुळची झेप आंतराष्ट्रीय पातळीवर

Archana Banage

मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील-संभाजीराजे

Archana Banage

कोल्हापूर : खबरदार ! पन्हाळ्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन

Abhijeet Khandekar